नांदेड- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रकमेत एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत (ओटीस) देण्याबाबत सुधारित एकरकमी योजना 31 मार्च 2025 पर्यत लागू करण्यात आली आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेवून कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन. झुंजारे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर नांदेड- 431605 किंवा दूरध्वनी क्रमांक (02462) 220865 वर संपर्क साधावा, असे महामंडळाच्यावतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
More Related Articles
शहाजी उमाप यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या दिवाळीच्या शुभकामना
नांदेड-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयनी अधिकारी…
कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा- अभिजीत राऊत
नांदेडमध्ये 28 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ नांदेड :- देशातील पारंपारिक कौशल्याला विकसित…
सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावतो म्हणून 18 लाख 38 हजारांची फसवणूक
नांदेड(प्रतिनिधी)-सार्वजनिक बांधकाम विभागात वाहन चालक पदावर नोकरी लावतो म्हणून नागपूर येथील एकाने नांदेडच्या एका युवकाला…