नांदेड (प्रतिनिधी)- प्रसिद्ध कथाकार तथा आकाशवाणी नांदेड केंद्राचे निवेदक , पत्रकार राम तरटे यांचे आज दि. ११ डिसेंबर रोजी देगलूर तालुक्यातील नरंगल बु. येथे महात्मा बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे कथाकथन आयोजित करण्यात आले आहे.
श्री वीरभद्र शिक्षण प्रसारक मंडळ नरंगल बु. संचलित महात्मा बसवेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे आद्य संस्थापक अध्यक्ष कै. शंकरराव गोविंदराव पाटील नरंगलकर यांच्या ३५ व्या स्मृतीदिनानिमित्त ‘लेखक आपल्या भेटीला…’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात प्रसिद्ध कथाकार राम तरटे यांचे कथाकथन आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अशोक देशमुख यांची उपस्थिती राहणार असून, प्राचार्य पी.एम. शिवारेड्डी, ए.एस. गोपछडे, पी.जी. हळदे, एस.जी. नक्कावार, एच.टी. सूर्यवंशी, एम.जी. डोकोरे, एच.बो. बोडके, आर.जी. बरडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचवेळी माजी मुख्याध्यापक माधव मोखेडे हेही कथा सांगणार आहेत. आयोजित कथाकथन कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थेचे सचिव अशोक देशमुख यांनी केले आहे.