नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे प्रवासादरम्यान रेल्वेने पाठविलेल्या चुकीच्या संदेशांमुळे प्रवाशी रेल्वे स्थानकावर येण्याअगोदर रेल्वे निघून गेली. रेल्वेच्या गलथानपणाबद्दल प्रवाशाने 1 लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्याचा अर्ज रेल्वे विभागीय कार्यालयात दिला आहे.
नांदेड येथील रिपब्लिकन सेनेचेे जिल्हाध्यक्ष प्रा.राजू सोनसळे यांनी दिलेल्या अर्जानुसार त्यांच्याकडे 9850570410 क्रमांकाचा मोबाईल आहे. ज्यावर व्हाटसऍप सुध्दा कार्यान्वित आहे. त्यांना नांदेड येथून छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जायचे होते. त्यांनी त्यासाठी 4 डिसेंबर 2024 रोजीचे रेल्वे टिकीट क्रमांक 4917399637 प्रमाणे 4 डिसेंबरचा रेल्वे गाडी क्रमांक 17058 देवगिरी एक्सप्रेसमध्ये आरक्षण केले होते. देवगिरी एक्सप्रेस ही गाडी नियमित वेळेत सायंकाळी 6.50 वाजता नांदेड येथून रवाना होते. प्रा.राजू सोनसळे यांना आलेल्या टेक्स मॅसेजनुसार ती गाडी त्या दिवशी 1 तास 6 मिनिटे उशीरा धावत होती. म्हणजे ती गाडी 7.50 वाजता नांदेड येथून रवाना होणार आहे. असे तीन संदेश राजू सोनसळे यांना आले. त्यामुळे त्यांनी त्यानुसार सायंकाळी 6.25 वाजता रेल्वे स्टेशनवर पोहचले. परंतू देवगिरी एक्सप्रेस सायंकाळी 7.15 वाजता निघून गेली होती आणि राजू सोनसळे हे आलेल्या संदेशानुसार 7.25 वाजता रेल्वे स्टेशनवर पोहचले होते. त्यामुळे त्यांना प्रवास करता आला नाही.
राजू सोनसळे यांच्या अर्जाप्रमाणे त्यांना अत्यंत महत्वाचे काम होते आणि रेल्वे विभागाने दिलेल्या टेक्स मॅसेजनुसार ते रेल्वे स्टेशनवर पोहचले परंतू गाडी अगोदरच निघून गेली होती. आपल्या सेवेमध्ये रेल्वेच्या त्रुटी राहिल्या आणि मला मानसिक व शारिरीक त्रास झाला. त्यासाठी रेल्वे विभागाने मला 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी नसता मी सक्षम प्राधिकरणाकडे याबद्दल न्याय मागेल असे पत्रात लिहिले आहे.