सध्या देशाच्या लोकसभा आणि राज्यसभेत शितकालीन सत्र सुरू आहे. यामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टी अनाकलनीय आहेत. तेथे वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा दर्जा एवढा वाईट आहे की, सुसंस्कृत देश म्हणून भारताचे जे नाव आहे ते रसातळाला जात आहे. टार्गेट राहुल गांधीला करून कवर अडाणीला दिले जात आहे. याप्रसंगात तर आता अमेरिका सुध्दा भारताविरुध्द आक्षेप घेत आहे. या परिस्थितीत देशाचे भले कसे होईल. हा प्रश्न आज सर्वात मोठा आहे.
भारतीय जनता पार्टीचे नेते अंबिका पाल यांनी सम्बल येथे जाणाऱ्या राहुल गांधीला का रोखले. या पत्रकारांच्या प्रश्नावर तांडव केला. ते म्हणाले राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे नेते आहेत मग ते सभागृहात न थांबता सम्बलला का जात आहेत. खरे तर असे म्हणणे हे अत्यंत गैर आहे. कारण सम्बल आणि मनीपुर येथे कोणी खासदार, कोणी नेते फक्त सभागृह सोडून नाही तर राजीनामा देवून जातील तरी ते देशाच्या कामासाठी जात आहेत. तरी पण राहुल गांधी हे सम्बलला सात दिवसांनंतर गेले. खा.राहुल गांधी यांचे तेथे जाणे ही त्यांची ड्युटी आहे. पण ते गेले तोपर्यंत तेथील सर्व परिस्थिती अटोक्यात आली होती. पण काही युवकांचा जीव गेला होता हे सुध्दा सत्यच आहे.
भारतीय जनता पार्टीचे दुसरे नेते सुधांशु त्रिवेदी यांनी तर बोलण्याचा कहरच केला आणि संसदेमध्ये राहुल गांधी सांगतात त्या बातम्या संसद चालू असतांना कशा येतात. असा प्रश्न उपस्थितीत केला. त्याला राज्यसभेचे सभापती जगदिप धनकड यांनी प्रमाणपत्र पण दिले की, ते बरोबर बोलत आहेत.खरे तर सभापतींना असे करता येत नसते.
भारतीय जनता पार्टीचे आणखी एक नेते संदीप पात्रा यांनी तर महाकहर केला आणि राहुल गांधी हे देशद्रोही आहेत, गद्दार आहे असे म्हटले. म्हणजे संदीप पात्रा हे ठरवणार काय? की देशात कोण गद्दार आहे, कोण देशद्रोही आहे. त्यासाठी एक न्यायालयीन प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पुर्ण न करताच असे कोणी सर्वसामान्य माणुस बोलेल तर त्याच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही होईल. राहुल गांधीवर आरोप करतांना संदीप पात्रा यांनी अमेरिकेवर सुध्दा भरपूर आरोप केले.
यावर पब्लिक इंडियाच्या एका विश्लेषण कार्यक्रमात मिनु जैन सांगत होत्या राहुल गांधी यांनी ओसीसीआरपी मध्ये आलेल्या बातम्यांना सभागृहात उपस्थित केल्यानंतर त्यांच्याविरुध्द उठविलेले रान म्हणजे आपल्यामधील पात्रता अत्यंत कमी असल्याचे दिसते. याच संदर्भाला जोडून सुधांशु त्रिवेदीचा हिशोब करतांना मिनू जैन म्हणाल्या की, राहुल गांधी एवढे ताकतवान आहेत काय? की जगातील प्रसार माध्यमे, वेगवेगळ्या देशातील राहुल गांधी यांचे स्त्रोत त्यांना दररोज आपल्या देशातील बातम्या देतात काय? हिंडनबर्ग अहवाल, ओसीसीआरपी, अमेरिकेचे न्यायालय हे काय राहुल गांधीच्या इशाऱ्यावर चालतात काय? आणि असा ताकतवान व्यक्ती राहुल गांधी आहे तर खरे तर देशाचे नेतृत्व त्याच्याकडेच असायला हवे. म्हणजे तो व्यक्ती जगात भारतासाठी काय-काय करेल हे सांगताच येणार नाही.पत्रकारांच्या स्त्रोतांनी दिलेली माहिती पत्रकारांनी कधी प्रसारीत करावी हा त्यांचा हक्क आहे. कधी-कधी पत्रकार आज मिळालेली माहिती राखून ठेवतात. हे सुध्दा काही खोटे नाही आणि त्यांना जेंव्हा प्रसारीत करायची असेल तेंव्हा त्या माहितीचा उपयोग करतात. राहुल गांधी विरुध्द खालच्या भाषेत बोलून आपली महत्ता दाखविण्याच्या प्रयत्नात अनेकांचाच आपल्या हाताने आपल्याच टिमविरुध्द गोल होत आहे. राहुल गांधीच्या सम्बल दौऱ्याबद्दल मिनू जैन सांगतात तुम्ही तेथे बुलडोजर चालवित आहेत आणि राहुल गांधीला तेथे जाण्यापासून रोखता हे विरोधी वर्तन आहे.
अडाणी संदर्भाच्या जागतिक प्रसार माध्यमांनी केलेल्या बातम्या तुम्ही खा.राहुल गांधींना संसेदेत बोलतांना अडाणीचे नाव घेवू देत नाही. पण तुम्ही भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्याविरुध्द त्याच सभागृहात ते आज सदस्य नसतांना अत्यंत खालच्या स्तरावर त्यांच्यावर आरोप करता. पुन्हा हे वर्तन परस्पर विरोधी आहे. द्वेषाची राजकारणात करतांना 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनी दोन्ही सभागृहाचे संयुक्त अधिवेशन असते. त्या दिवशी पंतप्रधानांना संयुक्त सभागृहासमोर भाषण करायचे असते. पण त्या मंचावर विरोधी पक्ष नेत्यांना सुध्दा बसण्याचा अधिकार आहे आणि यंदा विरोधी पक्ष नेते खा.राहुल गांधी हे आहेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते भाषणच रद्द केले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाऊन भाषण केले. ओसीसीआरपीने कोणत्याही आधारावर त्या बातम्या दिलेल्या नाहीत तर त्यांनी अडाणीवर थेट आरोप केलेला आहे आणि तिच बाब राहुल गांधींनी आपल्या संसदेत सांगितली. यामुळे राहुल गांधी यांचे काही चुकले असे म्हणता येणार नाही. आतकंवाद नको प्रेमळ भावना जगात पसरविण्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी देतात खरे पण पंतप्रधान स्वत: द्वेष करतात त्याबद्दल काय लिहावे.
संदीप पात्राचा समाचार घेतांना अमेरिकन दुतावासाने त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेतला आहे. प्रसार माध्यमांना जास्तीत जास्त स्वातंत्र्य देण्यासाठी अमेरिका काम करते आणि आमच्यावर असा आरोप केला जात आहे. याबाबत अमेरिकन दुतावासाने भारतासमोर आपला आक्षेप सादर केला आहे. काही प्रसार माध्यमे त्यांचीच आहेत. पण काही नाहीत. याचा अर्थ त्यांनी काहीच बोलू नये काय? हे मांडण्यासाठीच ही शब्दरचना.
पब्लिक इंडियाने पत्रकार मिनु जैन यांच्यासोबत केलेल्या विश्लेषणाची लिंक बातमीसोबत जोडली आहे.