नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीस ठाणे आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे यांनी संयुक्त कार्यवाही करत गोदावरी नदीपात्रातून चोरीने वाळू उपसा करणाऱ्या दोन जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
दि.4 डिसेंबर रोजी दुपारी इतवारा आणि नांदेड ग्रामीण येथील संयुक्त पथकाने मरघाट गाठले. त्या ठिकाणी फजल चाऊस बाबु चाऊस आणि शेख जावेद शेख जानी हे नदी पात्रातून चोरीने रेती उपसा करत होते. रेती उपसा करण्यासाठी ते तराफ्याचा वापर करत होते. त्या ठिकाणी पोलीसांनी पकडलेले 8 तराफे जाळून टाकले. जप्त केलेली रेती महसुल विभागाच्या स्वाधीन केली.
या प्रकरणी परिवेक्षाधिन पोलीस उपनिरिक्षक पंकज इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात शेख जाविद आणि फजल चाऊस विरुध्द गुन्हा क्रमांक 435/2024 दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक आदींनी पोलीस निरिक्षक रणजित भोईटे, ओमकांत चिंचोळकर यांच्यासह कार्यवाही पथकाचे सर्व पोलीस अंमलदारांचे कौतुक केले आहे.