नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेल्या निवड चाचणीत पुर्णा येथील प्राची वाघमारे यांची निवड महाराष्ट्र क्रिकेट संघात झाली आहे. त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 15 वर्षाखालील मुलींसाठी अंतर राज्य एक दिवशीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात पुर्णा शहरातील प्राची प्रशांत वाघमारे यांची निवड महाराष्ट्र संघात झाली आहे. जिल्हा क्रिकेट संघाचे अध्यक्ष संतोष बोबडे, शशिकुमार जवळेकर, सय्यद अब्दुल्ला, सुहास पावडे, ज्ञानेश्र्वर काकडे, सुरेश काकडे, प्रसाद बोरफळे, श्रध्दा बोरफळे आदींनी प्राची वाघमारेचे अभिनंदन करून पुढील स्पर्धांसाठी शुभकामना दिल्या आहेत.
प्राची वाघमारे या नांदेड येथील लिटल स्कॉअर्स पब्लिक स्कुलची विद्यार्थीनी आहे. प्राचीचे वडील प्रशांत वाघमारे हे विभागीय रेल्वे कार्यालयात अधिकारी आहेत. प्राचीचे आजोबा रेल्वे ड्रायव्हर म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. वास्तव न्युज लाईव्ह सुध्दा प्राचीच्या यशासाठी त्यांचे कौतुक करत आहे.