विदर्भातील वाघ प्रकाश पोहरे पुढाकार घेणार
नांदेड,मारकड वाडी येथे जनतेने आपलेच मतदान बॅलेट पेपरवर तपासण्यासाठी लावलेली आग आता राज्यभर पसरण्याच्या तयारीत आहे. 6 डिसेंबर रोजी विदर्भातील दोन गावात असे मॉक पोलिंग करून आपल्या मतदानाची तपासणी करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी घेतला आहे.या गावकऱ्यांच्या सोबत देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे सुद्धा राहणार आहेत. त्यांनी तर जेलमध्ये गेलो तरी चालेल पण माॅक पोलिंग पूर्ण करून घेणार असा निर्धार व्यक्त केला आहे.
माळशिरस विधानसभा मतदार संघातील मारकड वाडी या गावात 3 डिसेंबर रोजी होणारे बॅलेट पेपर वरील मतदार प्रशासनाने त्या गावात संचारबंदी जारी करून हाणून पाडले. पण आजही त्या गावकऱ्यांचा हा निर्धार आहे की आम्ही कोणतीही चूक करत नाही. भारतीय संविधानाने आम्हाला हा अधिकार दिलेला आहे आणि संविधाना मध्ये एकाही वाक्यात असे लिहिलेले नाही की मॉक पोलिंग करून आपण केलेल्या स्वतःच्या मतदानाची तपासणी करता येणार नाही. पण हे मतदान प्रशासनाने संचारबंदी लागू करून का रोखले. जो व्यक्ती आपला डाटा कोणत्याही मशीनमध्ये फीड करतो तोच त्या डाटाचा मालक असतो, असे जगात प्रसिद्ध आहे.पण मतदाराने केलेले मतदान हा त्याचा डाटा असताना सुद्धा त्याची सत्यता सांगितली जात नाही. याचा विचार केला तर या मतदान केंद्रांमध्ये राजीव कुमारच्या मशीन आणि बॅलेट पेपरच्या प्रमाणे मोजलेले मतदान यात अंतर आले तर ही आग महाराष्ट्रातच नव्हे हरियाणासह संपूर्ण देशात पसरेल.याची भीती शासनाला वाटत होती आणि म्हणूनच त्यांनी हा बॅलेट पेपर वरील मतदान तपासणीचा प्रकार रोखलेला आहे. सरकार खरेच असेल राजीव कुमारच्या मशीन मध्ये काही गडबड नसेल तर अशी बॅलेट पेपर वरची तपासणी करून घेण्यासाठी सरकारचा विरोध पण नसावा. विरोध होत आहे म्हणजे काहीतरी गडबड आहेच असे म्हणावेच लागेल.
मारकवाडी येथील गावकऱ्यांचा मतदानाचा खेळ संचारबंदीने रोखला असला तरी विदर्भातील काही गावांमध्ये ही मॉक पोलिंग होणार आहे.मारकड वाडी येथे निवडून आलेले आमदार उत्तम जानकर यांच्या समर्थकांनी ही तपासणी करण्याचे ठरवले होते. पण आता संपादक प्रकाश पोहरे यांच्या पुढाकारातून विदर्भातील दोन गावांमध्ये अशी बॅलेट पेपरची तपासणी होणार आहे त्यासाठी प्रकाश पोहरे यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही बॅलेट पेपर तयार करून त्या गावाच्या प्रत्येक घरात पोहचती करू आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर महाविकास आघाडी यावर शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांचे चित्र असतील. असा एक डब्बा तसेच महायुतीचा एक डब्बा ज्यावर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांची चित्रे असतील असे दोन डबे त्या सार्वजनिक ठिकाणी ठेव लोकांनी आपल्या घरात मतदान पत्रावर त्या मतदारसंघातील त्यांच्या आवडीच्या व्यक्तीच्या नावासमोर आपले मत व्यक्त करून ते सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या डब्यात आणून टाकायचे आहे त्यानंतर त्याची मोजणी होईल आणि राजीव कुमारच्या मशीन
मध्ये नोंदणी झालेले मत आणि कागदावर दिसणारे मत यातील फरक तपासला तर नक्कीच राजीव कुमारच्या मशीन मध्ये झालेले बरेच घोळ समोर येतील मारकवाडी येथे सुद्धा यापूर्वी दोन निवडणुकांमध्ये विजयी झालेले उत्तम जानकर यांना नेहमीच हजार पेक्षा जास्त मते मिळाली आहेत आणि यंदाच्या निवडणुकीत त्यांना 300 मते मिळाली आहेत. यावरूनच मारकवाडी गावातील लोकांनी हा तपासणीचा कार्यक्रम रचला होता. परंतु प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी तो हाणून पाडला आहे. प्रकाश पोहरे सांगतात माझ्या स्वतःच्या गावात आणि दुसऱ्या एका गावात मी ही मॉक पोलिंग करून घेणार आहे दोन्ही ठिकाणी मी स्वतः उभा राहणार आहे. आणि त्यावर माझ्याविरुद्ध शासनाने काही कार्यवाही केली तरी मी जेलमध्ये जायला सुद्धा तयार आहे आजपर्यंत 140 वेळेस मी जेलमध्ये जाऊन आलेलो आहे. आता पुढे असे काही घडले तर तो प्रकार 141 क्रमांकाचा असेल त्यामुळे जेल जाण्यासाठी मी घाबरणार नाही. पण सत्याची बाजू समोर आणण्यासाठी झटत राहील. मोदी सरकारने विकत घेतलेल्या प्रसार माध्यमांमध्ये सुद्धा प्रकाश पोरे आज सत्यासाठी झटत आहेत त्यांच्या या हिमतीला आमचाही सलाम.
-रामप्रसाद खंडेलवाल