नांदेड-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 6 डिसेंबर रोजी मुंबईला अभिवादनासाठी येणाऱ्या भीम अनुयायांसाठी नांदेडहून विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. या अनुषंगाने रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजू सोनसळे यांनी दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडे नुकतीच मागणी केली होती. या मागणीला यश आले आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले होते. 1956 पासून आज पर्यंत देशभरातील लाखो भीमा अनुयायी महापरिनिर्वाणदिनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर येत असतात. वर्षानुवर्ष भीमा अनुयायांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे नांदेड जिल्ह्यातूनही हजारो भीमसैनिक मुंबईकडे रवाना होतात मात्र त्यासाठी रेल्वेची संख्या अपुरी असल्याने नांदेडहून मुंबईसाठी विशेष रेल्वे गाडी सोडावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्राधl. राजू सोनसळे यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांकडे निवेदनाद्वारे केली होती.
या मागणीची दखल घेत दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दिनांक ५ डिसेंबर रोजी आदीलाबाद येथून विशेष सोडण्यात येणार आहे. शिवाय प्रतीच्या प्रवासात दिनांक ७ डिसेंबर रोजी मुंबईहून मनमाड – छत्रपती संभाजी नगर – नांदेड मार्गे ही रेल्वे आदिलाबाद पर्यंत सोडण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाने दिली आहे. प्रा. राजू सोनसळे यांच्या पाठपुराव्यामुळे हजारो भीम अनुयायांना ६ डिसेंबर रोजी मुंबईत दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याची संधी प्राप्त होणार आहे.
संबंधीत बातमी….
4 आणि 5 डिसेंबर रोजी दादरकडे जाणाऱ्या दोन विशेष रेल्वे गाड्यांची मागणी