माळशिरस मतदार संघातील निवडूण आलेल्या आमदाराच्या समर्थकांनी केली होती तयारी
नागरीकांची प्रसार माध्यमांना विनंती
प्रसार माध्यमांनी आजचा कार्यक्रमच पुर्वी दाखवला नाही.
नांदेड(प्रतिनिधी)-संविधानातील तरतूदीला डावलून शासन संविधानाचा कसा अपमान करीत आहे. याचे एक उदाहरण सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी या गावात आज दिसून आला. निवडुण आलेल्या आमदारांना मिळालेल्या मतांची मोजणी गावकरी आपल्या स्वखर्चाने मतदान पत्रिकेवर करून घेत असतांना प्रशासनाने संपुर्ण गावाला वेढा घालून त्यांच्या प्रयत्न आज हाणून पाडला आहे. तरी पण आम्ही मतदान पुर्ण करणारच अशी भुमिका गावकऱ्यांची आहे. यासाठी गावकरी प्रसार माध्यमांना मदत मागत आहेत. पण आजच्या काळातील प्रसार माध्यमांची विकलेली अवस्था पाहता प्रसार माध्यमे मारकडवाडीच्या गावकऱ्यांना काय मदत करतील हे परमेश्र्वरच जाणे.
महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदार संघामध्ये 254 क्रमांकाचा विधानसभा मतदार संघ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस हा आहे. हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. 2019 मध्ये या मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे उत्तमराव जानकर हे निवडूण आले होते. यंदाच्या निवडणुकीत उत्तमराव जानकर यांनी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाकडून ही निवडणूक लढवली. त्यांना 13 हजार 147 मताधिक्याने विजय मिळाला. त्यांना मिळालेल्या मतदानाची टक्केवारी 50.12 आहे. त्यांच्या विरोधातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राम विठ्ठल सातपूते यांना 44.70 टक्के मतदान मिळाले आणि त्यांचा पराभव झाला.

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी हे गाव विजयी उमेदवार उत्तमराव जाशकर यांचे आहे. मारकडवाडीत झालेल्या तीन मतदान केंद्रांवरील 1600 मतदानापैकी 1200 एवढे मतदान भारतीय जनता पार्टीचे राम विठ्ठल सातपूते यांना प्राप्त झाले आणि येथेच शंकेचा उगम झाला. तेंव्हा मारकडवाडी ग्राम पंचायतीच्या वतीने नागरिकांनी माळशिरस मतदार संघाच्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्याकडे असा अर्ज केला की, आम्ही आपल्या स्व:खर्चाने, आमच्याच निवडणुक निर्णय अधिकाऱ्यापुढे, मतदान पत्रिकेने आणि प्रसार माध्ममां समोर मतदान घेवून आमच्या मतांचे काय झाले याची तपासणी करणार आहोत. त्यासाठी गावकऱ्यांनी आज दि.3 डिसेेंबरची तारीख ठरवली. माळशिरस मतदार संघाच्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी एक व्हिडीओ जारी करून हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले. पण गावकऱ्यांनी ठरवलेल्या प्रमाणे त्यांनी मतदान केंद्र तयार केले, मतदान पत्रिका तयार केल्या. मतदान पत्रिकेवर ठप्पा मारण्यासाठी शिक्का तयार केला आणि गावातील यादी घेवून पहाटे 7 वाजता सर्व तयारी सुरू झाली. त्या अगोदर काल रात्री प्रशासनाच्यावतीने सोलापूर ग्रामीण पोलीसांनी मारकडवाडी गावकऱ्यांना नोटीस दिली. आज सकाळी तर सोलापूर ग्रामीण पोलीसांनी संपुर्ण गावाला वेडा टाकला आणि मतदान घेतले तर तुमच्यावर गुन्हे दाखल करू, मतदानाचे साहित्य जप्त करू असा दबाव आणला.आज त्या ठिकाणी काही पत्रकार दिसत होते. ते गावकऱ्यांशी बोलत होते. पण मारकडवाडी गावाने घेतलेला मतदानाचा निर्णय आणि त्याची तारीख पूर्वी कोठेच प्रसिध्द केली नव्हती.दाखवली पण नव्हती.
गावकरी आज सांगत होते की, आम्ही केलेले मतदान कोठे गेले आहे याची तपासणी आम्ही आमच्या लेवलवर, आमच्या खर्चाने आमच्याच लोकांच्या मदतीने करून घेत आहोत. यावर प्रशासनाला आक्षेप घेण्याचे काही गरज नाही. एक महिला सांगत होती पोलीसांच्या भितीमुळे अनेक महिला घराबाहेर आल्या नाहीत. तरीपण आम्ही ज्या महिला आलो आहोत त्यांना मतदान करायचेच आहे. गावातील पुरूष मंडळी सांगत होती की, भारतीय संविधाना मध्ये आमची तपासणी आम्ही स्वत: करायची नाही असा एक वाक्याचा उल्लेख कोठेही नाही. म्हणजे आज प्रशासन करत असलेली दंबगाई हा लोकशाहीचा खून आहे. आम्ही काही मागणार नाही, तपासणी झाल्यानंतर आमचे मतदान कोठे गेले हे निश्चित करणे आमचा हक्क आहे. निवडणुक आयोगाने आम्ही केलेले मतदान कोठे गेले हे दाखवावे तर आम्ही मतदार प्रक्रिया करून घेणार नाही. पण निवडणूक आयोग असे काही करत नाही. म्हणजेच कोठे तरी राजीवकुमार यांच्या मशिनमध्ये घोटाळा आहे. विशेष म्हणजे निवडूण आलेल्या आमदारासाठी हा प्रकार गावकरी करत आहेत. निवडूण आलेले आमदार शरद पवार गटाचे आहेत. म्हणून त्यांच्या समर्थनार्थ होणाऱ्या या मतदान पत्रिकेवरील मतदानाला रोखण्यात आले आहे, असा आरोप गावकऱ्यांचा आहे. सत्येत मताधिक्य मिळवलेल्या भाजपला याची गरज नाही. म्हणून त्यांनी यावर कोठेच आवाज उठवलेला नाही. पण आम्ही भारतीय जनता पार्टीला मतदानच केले नाही. तर त्यांना मतदान कसे मिळाले हा मारकडवाडी गावातील लोकांचा प्रश्न चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. यावेळी उत्तम जाणकर यांनी सुध्दा सांगितले की, जोपर्यंत न्याय मिळणार नाही. तो पर्यंत मी आणि माझे गावकरी ही लढाई थांबवणार नाही.
एक महिला प्रसार माध्यमांना सांगत होती की, आम्ही हे मतदान तुमच्यासमोर करणार आहोत. तेंव्हा आमचे काही चुकतच असेल, आम्ही काही गोंधळ घातला असेल,आम्ही काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला असेल तर तुमच्याकडे व्हिडीओ रेकॉर्डींग होत आहे.त्यानंतर सुध्दा आमच्यावर कायदेशीर कार्यवाही करता येईल. पण आमचे स्व तपासणीचे मतदान रोखणे हा भविष्यात लोकशाहीला घातक आहे. मारकडवाडीच्या सर्व गावकऱ्यांनी आपसात चर्चा केल्यानंतरच मतदान पत्रिकेवर मतदान करून घेण्याची तयारी केली आहे. यामुळे आम्हाला प्रसार माध्यमांनी मदत करावी. पण मारकडवाडीची मतदानाची तारीख त्यांनी ठरवलेला कार्यक्रम ज्या प्रसार माध्यमांनी जनतेला दाखवलाच नाही. आता त्यांच्याकडून मतदानावर प्रशासनाने पोलीस विभागामार्फत दबाव आणला गेला. ही घटना मोदी शासनाला विकलेली प्रसार माध्यमे दाखवतील काय ? या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे पण नाही.