नांदेड(प्रतिनिधी)-उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणीपुर येथे बंद असलेल्या रिकाम्या घराला फोडून चोरटयांनी 3 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. सोबतच महाराष्ट्र ग्रामीण बॅंक तामसा शाखेतून एका व्यक्तीची नजर चुकवून त्याच्या थैलीतील 1 लाख रुपये चोरट्यज्ञांनी गायब केले आहेत.
नागनाथ गुणाजी नागुलवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 1 डिसेंबर रोजी रात्री गणीपुर येथील त्यांच्या जुन्या घराला कुलूप लावून ते नवीन घरात झोपण्यासाठी गेले. 2 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता त्यांचे जुने बंद असलेले घर फोडलेले दिसले. तपासणी केली असता घरातील लाकडी कपाटामध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा एकूण 3 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. उमरी पोलीसांनी या चोरीच्या घटनेला गुन्हा क्रमांक 392/2024 प्रमाणे नोंदवले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक आरमाळ हे करीत आहेत.
तामसा येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शाखेत दि.30 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास सुजित भगवान सुर्यवंशी हे व्यक्ती गेले. त्यांनी आपल्या जेसीबीसाठी टायर खरेदी करायचे आहेत म्हणून 1 लाख रुपये काढले. ती 1 लाख रुपये रक्कम आपल्या हातातील थैलीमध्ये ठेवून सुजित सुर्यवंशी बॅंकेच्या कर्मचाऱ्यासोबत केवायसी करण्याबाबत चर्चा करत होते. याच संधीचा फायदा चोरट्यांनी उचलला आणि त्यांच्या बॅगमधील 1 लाख रुपये रक्कम काढून घेतली आणि पसार झाले. तामसा पाोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 132/2024 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस अंमलदार नागरगोजे अधिक तपास करीत आहेत.