जिल्हास्तरीय युवा महोत्सवास उत्साहात सुरुवात

नांदेड- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ व युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन 01-02 डिसेंबर,2024 या कालावधीत मंच क्रं.01- जिल्हा क्रीडा संकुल, बास्केटबॉल मैदान, नांदेड, मंच क्रं. 02- डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, स्टेडीयम परीसर, नांदेड व मंच क्रं.03- जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल, नांदेड, या ठिकाणी करण्यात आले.

या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे उदघाटन आज 01 डिसेंबर,2024 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीमती सान्वी जेठवाणी (राज्य निवडणुक दुत,भारत सरकार), श्रीमती चंदा रावळकर (युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, नांदेड), मा.श्रीमती कविता जोशी (जिल्हा समन्वयक,सी.सी.आर.टी न्यु दिल्ली) व्यासपीठावर संजय बेतीवार (क्रीडा अधिकारी), बालाजी शिरसीकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन), चंद्रप्रकाश होनवडजकर (राज्य क्रीडा मार्गदर्शक), राहुल श्रीरामवार (क्रीडा अधिकारी), विपुल दापके (क्रीडा अधिकारी), संतोष कनकावार (वरिष्ठ लिपीक) आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात युवा महोत्सव म्हणजे युवकाना आपल्या मधील कलागुण दाखविण्याचे एक खुले व्यासपीठ असुन या मध्ये युवकांचा सर्वागिण विकास करणे, देशाची संस्कृती व परपंरा जतन करणे, राष्ट्रीय एकात्मता वाढिस लावणे, युवकाना तृणधान्याचे महत्त्व पटवुन देणे, शिक्षण, उद्योग व्यवसाय, या सोबतच शेती या व्यवसायाशी युवकाची ओळख करून देणे, सामाजिक विकासात विज्ञानाचे महत्त्व युवकाना पटवुन देणे इत्यादी बाबीवर युवा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. तसेच यामध्ये प्राविण्य प्राप्त करणारे स्पर्धक हे लातूर येथे संपन्न होणा-या विभागीय युवा महोत्सवात सहभागी होणार आहे. तसेच राज्यस्तरीय युवा महोत्सव आयोजनाचे यजनाम पद नांदेड जिल्हयास मिळालेले असल्यामूळे नांदेड जिल्हयातील जास्त-जास्त स्पर्धक सहभागी होण्याबाबत शुभेच्छा दिल्या.

या युवा महोत्सवामध्ये 1) सांस्कृतिक कला प्रकार:- समुह लोकनृत्य, लोकगीत 2) कौशल्य विकास:- कथालेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), कविता (500 शब्द मर्यादा सहभाग संख्या 01), 3) संकल्पना आधारीत स्पर्धा:- विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना (Innovation in science and Technology) 4) युथ ऑयकान:- युथ ऑयकान जिल्हयातुन युवक कल्याण क्षेत्रात तसेच युवांना प्रभावित कार्य केलेल्या 15 ते 29 वयोगटातील 5 युवांना विभागीयस्तरावर सहभागी होता येणार आहे.

उदघाटन प्रसंगी श्रीमती सान्वी जेठवाणी (राज्य निवडणुक दुत,भारत सरकार) यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा त्यांचे कलागुण विकसीत व्हावेत यासाठी शासनाने हे व्यासपीठ उपलब्ध करुन दिलेले आहे. त्याचा स्पर्धकांनी उपयोग करुन घ्यावा. त्याचबरोबर मनोरंजानाबरोबरच स्पर्धकांनी खेळाकडे वळावे याबाबत मार्गदर्शन केले.

या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाकरीता श्रीमती सान्वी जेठवाणी यांचेबरोबरच विविध कलाप्रकाराचे परिक्षक म्हणुन संदीप काळे, डॉ. पांचाळ पांडुरंग, डॉ.संदिप देवुळगांवकर, डॉ.मनिष देशपांडे, डॉ.शिवराज शिंदे, डॉ.आनंद आष्टुरकर, डॉ.संभाजी मनुरकर, डॉ.बालाजी पेनूरकर, श्रीमती कविता जोशी, आदी परीक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्यक्रमाचे प्रस्तावीक बालाजी शिरसीकर यांनी केले तर सुत्र संचलन डॉ. पांचाळ पांडुरंग यांनी केले.

हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी कार्यालयातील संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, इक्रम शेख, चंद्रकांत गव्हाणे, विद्यानंद भालेराव, यश कांबळे आदी परिश्रम घेत आहेत.

या युवा महोत्सवाचा नांदेड जिल्हयातील रसिकांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!