पुणे (प्रतिनिधी)- शहरातील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात 26 नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्यावेळी संचालक शैलेश सर, दिपक सर, नांदेडकर सर, गणेश सर उपस्थित होते.
यावेळी एस.एन.नांदेडकर सरांनी संविधानाचे महत्व सांगितले तद्नंतर संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी भारतीय संविधानाविषयी आपापले विचार व्यक्त केले. यावेळी सिंहगड अँकँडमीचे सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वैभव फिरंगे, विनायक सुर्यवंशी, गिरीधर खोत,यश जाधव, रविराज अहिवळे,अक्षय मोरे,ॠषिकेश येणपुरे, आदित्य शिंदे,संकेत धनवडे, गौरव भारती आणि विद्यार्थींनी ऐश्वर्या गायकवाड, महानंदा कुसाळकर, श्रावणी शिर्के, श्रृष्टी तेले, प्रियंका हंबीर, रोशनी तकीक, साक्षी सुर्वसे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता देशभक्तीपर नारे देवून करण्यात आली.