नांदेड(प्रतिनिधी)-राधिकानगर मंगल कार्यालयासमोरचे एक घरफोडून चोरट्यांनी 3 लाख 23 हजार 293 रुपयांचा ऐवज चोरला आहे. कुंडलवाडी ते धर्माबाद रस्त्यावर बॅंकेतून काढलेले 2 लाख 70 हजार रुपये घेवून जाणाऱ्या व्यक्तीला हुल देवून दोन दुचाकी स्वारांनी ते पैसे चोरले आहेत.
अण्णाराव गोविंदराव लांडगे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 8 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान राधिकानगर मंगल कार्यालयासमोरचे त्यांचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेवून चोरट्यांनी ते घरफोडले आणि घरातील 2 लाख 34 हजार 293 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिणे आणि 89 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 23 हजार 293 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 586/2024 नुसार दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक मस्के अधिक तपास करीत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत आत्माराम गंगाराम देगावे रा.दौलापूर ता.बिलोली यांनी कुंडलवाडी येथे बडोदा बॅंकेतून धनादेशाद्वारे 2 लाख 70 हजार रुपये काढले आणि आपल्या दुचाकीवर बसून धर्माबादकडे जात असतांना कुंडलवाडी धर्माबाद रस्त्यावरील महालक्ष्मी मंदिरासमोर दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी तुमचे पैसे पडले आहेत असे सांगितल्याने त्यांनी खाली उतरून पाहिजे. त्या दरम्यान त्यांच्या दुचाकीवर असलेली 2 लाख 70 हजार रुपये रोख रक्कमेची थैली घेवून ते दोन चोरटे आपल्या दुचाकीवर पळून गेले. कुंडलवाडी पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 189/2024 प्रमाणे दाखल केली आहे. पोलीस अंमलदार चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
बसस्थानकात महिलेचे पैसे चोरले
माहुर बसस्थानकावर बसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारी असणाऱ्या अंगणवाडी सेविका चंद्रकला हरिश्चंद्र पवार यांच्या पर्समधील 24 हजार 500 रुपये रोख रक्कम पर्सची चैन काढून कोणी तरी चोरट्यांनी चोरले आहे.
बाजारात व्यस्थ असणाऱ्या महिलेचे पाकीट चोरले
शिवाजीनगरहद्दीतील जीवन जेवंतराव शिंदे हा व्यक्ती शुक्रवारच्या बाजारात व्यस्त असतांना प्रेम कमलाकर गायकवाड आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने त्यांच्याकडील 5 हजार रुपये रोख रक्कम आणि इतर कार्ड असलेले पाकिट चोरले.