वंचितचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी पैसे वाटपाची खोटी तक्रार दिली- रमेश गांजापूरकर

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड उत्तरमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी खोटी व बनावट स्वरुपाची माहिती देवून भरारी पथकाकडून माझ्या घराची झडती घ्यायला लावली. या संदर्भाने राष्ट्रवादी कॉंग्रेस सेवा दल अजितदादा गटचे जिल्हाध्यक्ष रमेश गांजापूरकर यांनी आचार संहिता कक्षात तक्रार केली आहे.
निवडणुक निर्णय अधिकारी 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघ यांच्या नावे लिहिलेल्या अर्जात रमेश गांजापूरकर सांगतात की, आज 19 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 ते 2 वाजेदरम्यान मला आदर्श आचार संहिता निवडणुक पथक यांच्याकडून माझ्या घराची झडती होत असल्याची माहिती मिळाली. तेंव्हा मी त्वरीत घरी पोहचलो. त्यावेळी माझ्या घरासमोर मोठा जनसमुदाय तसेच भरारी पथक व त्यांचे सहकारी पथक थांबलेले होते. मी त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, भ्रमणध्वनी क्रमंाक 9545557111 या क्रमांकावरून राजेशनगर तरोडा नाका येथे गांजापूरकर यांच्या घरामध्ये पैशाचे वाटप होत असल्याची तक्रार आली. म्हणून आम्ही तपासणीसाठी आलो आहोत. मी ट्रु कॉलरवर या ऍपवर 9545557111 या क्रमांकाची माहिती घेतली असता तो दुरध्वनी क्रमांक वंचित बहुजन आघाडीचे नांदेड उत्तर मधील उमेदवार प्रशांत इंगोले यांचा असल्याचे मला दिसले. यानंतर मी भरारी पथकाला माझ्या घराची तपासणी करू दिली. त्या पथकास खात्री झाली की, येथे पैसे वाटपासारखा काही प्रकार घडलेला नाही. माझ्या घरामध्ये फक्त महिला होता. त्यात माझ्या आईचे वय 80 वर्ष असून त्यांच्या हृदयाची बायपास सर्जरी झाली आहे. भरारी पथकाला पाहुन माझ्या आईची तब्बेत आणखी खालावली. त्यांना इतरही बरेच आजार आहेत. तिच्या प्रकृतीचे काही बरे-वाईट झाल्यास प्रशांत इंगोले यांना जबाबदार समजून माझ्याविरुध्द खोटी तक्रार दिली म्हणून त्यांच्याविरुध्द निवडुणक आचार संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी मागणी रमेश शंकरराव गांजापूरकर यांनी आपल्या अर्जात केली आहे. या अर्जाच्या प्रति जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, आदर्श आचार संहिता भरारी पथक प्रमुख 86-नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघ आणि पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!