नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड दक्षीणमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुख अहेमद यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून निवडणुकीत भाग घेता येवू नये अशी मागणी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे भारतीय जनता पार्टीचे खासदार डॉ.अजित गोपछडे यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचार करतांना नांदेड दक्षीण मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार फारुख अहेमद यांनी टिपु सुलतान यांचा पुतळा उभारणी बाबत विधान केले. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह व इतर नेत्यांचे नाव घेवून धमकी वजा बोलत हिम्मत असेल तर माझ्यावर कार्यवाही करा मी टिपु सुलतानचा पुतळा उभारणाच, मेरा कुछ कोई उखाड नहीं सकता असेही वक्तव्य केले.
भारतीय राज्य घटनेनुसार दोन धर्मात तेढ निर्माण करणे, धार्मिक आधारावर मतांचे धु्रवीकरण करणे, दोन धर्मात तेढ निर्माण करणे यासंदर्भाने केंद्रीय निवडणुण आयोग व राज्य निवडणुक आयोग यांच्या कायद्यानुसार त्यांची निवडणुक रद्द करावी, त्यांना उद्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाग घेता येवू नये अशी सोय करावी. प्रचारादरम्यान धार्मिक चिथावणी दिल्यामुळे यापुर्वी महाराष्ट्रात अनेक निवडणुका रद्द झाल्या आहेत म्हणून तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी डॉ.अजित गोपछडे यांनी केली आहे. या अर्जाच्या प्रति केंद्रीय निवडणुक अधिकारी दिल्ली, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र, गृहमंत्री भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पोलीस अधिक्षक नांदेड यांना दिल्या आहेत.