हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 80 हजार रुपये सापडले

हदगाव(प्रतिनिधी)-हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चार चाकी गाडीला तपासण्यासाठी थांबविले असता त्यात असणारा माणुस गाडीतील बॅग घेवून पळाला आणि आपली ओळख नाही अशा घरात जावून बेड रुमखाली लपून बसला. तरी पोलीसांनी ती रक्कम जप्त केली आहे आणि तपासणीसाठी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांकडे पाठविली आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सध्या सर्वात जास्त नामांकित असलेल्या महेंद्र कंपनीच्या थार गाडी क्रमांक एम.एच.26 सीएम 9991 ला पोलीसांनी आणि महसुल विभागाच्या पथकाने थांबवले. त्यांना त्या गाडीची तपासणी करायची होती. पण गाडी थांबवून गाडीतील माणुस आपल्या हातात एक बॅग घेवून पळाला.तेंव्हा पोलीस आणि महसुल पथक त्याच्या मागे पळाले. तो अनेक गल्यांमधून पळत एका घरात शिरला. पोलीस पथक आणि महसुल पथक तेथे पोहचले. तेंव्हा त्या घराच्या मालकाने एवढ्यात आमच्या घरी कोणीच आले नाही असे सांगितले. पण सुतावरून स्वर्ग गाठण्याची मेहनत घेणाऱ्या पोलीसांनी त्या घराची तपासणी केली. तेंव्हा त्या घराच्या बेडमधील पलंगाखाली एका माणुस बॅग घेवून लपलेला होता. त्याला पाहताच पोलीसांपेक्षा जास्त त्या घराच्या लोकांची अवस्था वाईट झाली. पण पुढे त्या घरातील लोकांशी त्या बॅगवाल्या व्यक्तीचा काही संबंध नाही. हे सिध्द झाले. तेंव्हा पोलीसांनी ती बॅग आणि तो माणुस आपल्यासोबत घेवून गेले. त्याचे जयसिंह धनंजय शिंदे (24) रा.शास्त्रीनगर नांदेड, अमोल रामराव आडे (30) रा.देविनगर तांडा हदगाव या दोघांना ताब्यातघेतले असून त्या बॅगमध्ये 7 लाख 80 हजार रुपये रोख रक्कम आहे आणि चार चाकी गाडी किंमत 15 लाख रुपये असा एकूण 22 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्या चार चाकी गाडीची तपासणी केली तेंव्हा त्यात कोणत्याही राजकीय पक्षाचे कोणते कागदपत्र, बॅनर, कोणाचे आधार कार्ड सापडले नाही. सध्या पोलीसांनी जप्त केलेली गाडी आणि 7 लाख 80 हजार रुपये निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले आहेत. तसेच या संदर्भाची माहिती आयकर विभागाला दिली आहे. पण तेथील आमचे माहितगार सांगतात तो व्यक्ती सांगत होता की, हे पैसे कंत्राटदाराचे आहेत. म्हणजे आता तो कंत्राटदार कोण, पैसे कोठे जात होते, कोठून आणले होते, कोणाला द्यायचे होते. या प्रश्नांची उत्तरे शोधणे पादर्शक असलेल्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्याचे काम आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!