पोलीसाने केलेले टपाली मतदान व्हायरल केेल्यामुळे गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील 231-आष्टी विधानसभा मतदार संघातील निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने 185-मलाबारहिल या विधानसभा क्षेत्रात टपाली मतदान केलेल्या एका पोलीसाने आपले मतदान व्हायरल केल्यामुळे त्या पोलीस शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी विधानसभा मतदार संघामध्येक एक टपाली मतदार व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या घटनेबाबतची माहिती घेतल्यानंतर आष्टी निवडणुक निर्णय अधिकाऱ्याने ज्या मोबाईल क्रमांकवरून ती मतपत्रिका व्हायरल झाली तो नंबर मिळवला आणि सर्व माहिती घेवून याबाबतचा अहवाल मलबारहिल विधानसभा क्षेत्रातील निवडणुक अधिकाऱ्यांना पाठवला.
आष्टी तालुक्यातील एक युवक गणेश अशोक शिंदे हा मुंबई येथे पोलीस झाला. त्याचा बकल नंबर 215235 असा आहे. तो सध्या सशस्त्र पोलीस ताडदेव मुख्यालयात कार्यरत आहे. मलाबारहिल येथील निवडणुक निर्णय अधिकाऱ्याच्यावतीने प्रसन्ना मधुसुदन तांबे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर 14 नोव्हेंबर रोजी घडलेल्या या मतपत्रिकेच्या व्हायरल प्रकरणी 15 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाणे गावदेवी येथे पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे विरुध्द भारतीय न्याय संहितेतील कलम 223 आणि लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 128 प्रमाणे गुन्हा क्रमांत 769/2024 दाखल करण्यात आला आहे. या पोलीस शिपायाने आष्टी मतदार संघाचे आपले टपाली मतदार करून त्याचा फोटो काढून आष्टी तालुक्यात व्हायरल केले होते. या प्रकरणाचा तपास गावदेवी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरिक्षक अनिकेत शेंडगे हे करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!