नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत किवळा ते लोंढेसांगवी जाणाऱ्या एका व्यक्तीला लुटणाऱ्या तिन जणांना पकडून सोनखेड पोलीसांनी 24 तासात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्या तिघांना पकडल्यामुळे एकुण 4 गुन्ह्याची उकळ झाली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मारोती बालाजी लोंढे हे किवळा ते लोंढे सांगवी जात असतांना त्यांना तीन लोकांनी रोखून लुटले होते. अशाच प्रकारे महंत ओमगिरी रा.सोनबडी मंदिर सोनखेड, रत्नाकर माधव शिधापुरे रा.सोनखेड आणि बंडू नागनाथ तेजबंद रा.शेवडीबाजार यांना अनुक्रमे 13 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि 11 नोव्हेंबर रोजी लुटण्यात आले होते. सोनखेड पोलीसांनी या संदर्भाने मारोती लोंढे यांना लुटणाऱ्या तिघांना पकडले. मारोती लोंढे यांनी नावासह तक्रार दिली होती. त्यांना पकडताच मारोती लोंढेच्या लुटीसह इतर तिन गुन्हे उघडकीस आले. या संदर्भाने लुटणाऱ्या माणसांची नाावे अशी आहेत. ओमकार गोविंद टर्के (28) दिगंबर संभाजी टर्के (27) दोघे रा.किवळा आणि गंगाधर सोपान शिंदे (32) रा.हरबळ ता.लोहा यांना पकडले. यांच्याकडून चोरीला गेलेल्या 1 लाख 5 हजार रुपयांच्या ऐवजातील 95 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराव धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक यांनी या उत्कृष्ट कार्यवाहीसाठी सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक वैशाली कांबळे, पोलीस अंमलदार गणपत गिते, वामन नागरगोजे,विश्र्वनाथ हंबर्डे, अंगद कदम, रमेश वाघमारे, दिवाकर कवाळे आणि केशव कुंडकर यांचे या उत्कृष्ट कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.