नांदेड(प्रतिनिधी)-मलकापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीसांवर जिवघेणा हल्ला करून फरार झालेला गुन्हेगार नांदेड पोलीसांनी पकडून मलकापुर पोलीसांच्या स्वाधीन केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वजिराबाद पोलीसांनी काल दि.13 नोव्हेंबर रोजी मनोजसिंग सिकंदरसिंग टाक (34) रा.म्हाडा कॉलनी जि.बुलढाणा हा नांदेडमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास पकडले. मनोजसिंग टाकने दि.1 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस पथक त्याच्या घरी गेले असतांना हातात तलवार घेवून पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिमराव घुसळे यांच्यावर आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारावर हल्ला केला. तरीपण सुनिल घुसळे यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. त्यावेळी पोलीस अंमलदार शेख नासेर यांच्यावरही हल्ला केला. त्यावेळी हजर असलेले सहाय्यक पोलीस निरिक्षक ईश्र्वर वर्गे यांच्या आदेशाने पोलीस अंमलदारांनी एक राऊंड फायर केला. तरी पण तो आणि त्याच्या घरातील महिला पोलीसांवर दगडफेक करीत होत्या. पोलीसांनी आपल्या बचावासााठी दोन गोळ्या हवेत झाडल्या पण मनोजसिंग टाक हा फरार झाला. त्यावेळी पोलीसांनी दाखल केला गुन्हा क्रमांक 434/2024 मध्ये मनोजसिंगची पत्नी अनिता टाक आणि नातलग महिला जमनाबाई अजितसिंग धोंड यांना पकडले. पण मनोजसिंग फरार झाला. मनोजसिंग टाकवर बुलढाणा व जळगाव जिल्ह्यामध्ये जबरी चोरी, खुना प्रयत्न, घरफोडी, चोरी, गंभीर दुखापती करणे, घातक व बेकायदेशीर अग्नीशस्त्र वापरणे असे 15 गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतीका यांनी वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम, सहाय्यक पोलीस निरिक्षक आर.डी. वटाणे, पोलीस अंमलदार शरदचंद्र चावरे, भाऊसाहेब राठोड, ज्वालासिंघ बावरी यांचे या कार्यवाहीसाठी कौतुक केले आहे.