इतरांना घोटाळेबाज म्हणणाऱ्या नरेंद्र मोदीच्या पीएम केअर खात्यात सुध्दा मोठा घोटाळा

हाराष्ट्र निवडणुक प्रक्रियादरम्यान पंतप्रधान केअर(जुने नाव पंतप्रधान मदत निधी) संदर्भाने धक्कादायक माहिती समोर आली आहे. सन 2021 ते आजपर्यंत या पंतप्रधान केअर खात्याचा हिशोबच दाखविण्यात आलेला नाही. तसेच त्या संदर्भाने माहिती अधिकारात माहिती मागितली तर ही संस्था खाजगी आहे असे उत्तर दिले जात आहे. अर्थात पंतप्रधान मदत निधी किंवा पंतप्रधान केअरमध्ये घोटाळा आहेच. इतरांना घोटाळेबाज म्हणत असतांना आपण काय आहोत याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी करत नाहीत हेच दिसते.
एका सामाजिक कार्यकर्त्याने पंतप्रधान केअरचे खाते ऑनलाईन चेक असले असता त्यात सन 2021 पासून आजपर्यंतचा हिशोबच दाखविण्यात आलेला नाही. 2020 मध्ये देशभर कोविड आक्रोश असतांना पंतप्रधान मदत निधीला पैसे देण्याऐवजी पंतप्रधान केअर या खात्यात पैसे द्या असे जाहीर सांगण्यात आले होते. त्याची देखरेख तीन मंत्री आणि पीएमओ कार्यालय पाहते. 10 नोव्हेंबर रोजी कार्यकर्त्याने ते खाते तपासून त्याची सिक्रीन शॉर्ट काढली आणि ती आपल्या ट्विटर हॅन्डलवर प्रसारीत केली. त्यानंतर या बाबीवर विविध लोकांनी चर्चा सुरू केल्या.
या चर्चांमध्ये असा सुर दिसू लागला की, सन 2020 मध्ये काही दवाखान्यांना वेंटीलेटर दिले होते. त्यावर पीएम केअर हे स्टिकर लावलेले होते. त्या वेंटीलेटरमुळे लोकांचा जीव वाचण्याऐवजी अनेक लोकांचा जीव गेला आणि त्यानंतर लोकांनी वेंटीलेटर कोठून आणले याची माहिती विचारली असता पीएम केअर खात्याची माहिती देता येत नाही. कारण तो खाजगी ट्रस्ट आहे असे उत्तर देण्यात आले. पंतप्रधान मदत निधी हे खाते बदलून पीएम केअर कोणी केले. त्यात आलेले पैसे आणि त्या पैसांचा विनियोग जनतेला समजायलाच हवा हा त्यांचा अधिकार आहे. पण असे होत नाही. म्हणजेच काही तरी घोटाळा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वारसदार म्हणवणारे अमित शाह यांनी महाराष्ट्रात भाषण करतांना देशात घोटाळ्यांचा सुत्रधार शरद पवार आहे असे एका जाहीर सभेत सांगितले होते. पण काही दिवसानंतरच हजारो कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील नामांकित अजित पवारांना शाह यांनी आपल्या मांडीवर बसवले. त्यानंतर शरद पवारांनी सुध्दा याचे उत्तर देतांना सांगितले होते की, कोणी तडीपार माझ्याबद्दल बोलतो काय.
पंतप्रधान मदत निधी योजनेचे खाते पंतप्रधान केअर करतांना कायद्या सुध्दा बदलला होता. याचा थांग पत्ता भारताच्या जनतेला लागला नाही. पण तो बदलला असेल तरी ती माहिती सर्वांना देणे आवश्यक होते. अशाच पध्दतीने सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची नियुक्ती करतांना सुध्दा कायद्या बदलण्यात आला होता. आज तर डोभालबद्दल जगभर चर्चा सुरू झाली आहे. कॅनडा तर त्यांच्यासह अमित शाहचे नाव सुध्दा आपल्या येथे झालेल्या एका मृत्यू प्रकरणाचे सुत्रधार म्हणून घेत आहे. कालपरवाच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनॉल्ड ट्रम यांची निवड झाली. त्यांनी तर माझ्या देशात बाहेरचे लोक काम करायला येणारच नाहीत अशी भुमिका जाहीर केली आहे. त्यात सर्वात जास्त मंडळी भारताची आहे. काय करणार मग केंद्र शासन.
पीएम केअरमध्ये झालेला घोटाळा इलेक्शन बॉन्ड पेक्षा मोठा असेल असे विश्लेषक बोलत आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत विजय मिळविण्यासाठी चाललेली धडपड केंद्राची सत्ता टिकविण्यासाठी नाही काय? असा प्रश्न या पीएम केअरच्या घोटाळ्यानंतर समोर आला आहे. हरियाणापेक्षा जास्त ईतिहास घडवून आम्हाला मतदान करा असे पंतप्रधान सांगत आहेत. म्हणजे कोठे तरी भिती आहे की, आम्ही या निवडणुकीत हरलो तर केंद्राची सत्ता सुध्दा जाईल.

-रामप्रसाद खंडेलवाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!