नवीन नांदेड-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील जेषठ नागरिक व व्दियांग मतदाराचे निवासस्थानी येऊन निवडणूक पथकाने मतदान करून घेतले.
नांदेड लोकसभा पोट निवडणुकी साठी अधिकृत उमेदवार व नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील अधिकृत उमेदवार निवडणुक साठी निवडणूक अधिकारी यांच्या कडे बिएलओ मार्फत भरून दिलेल्या विवरण पत्रातील मजकूर नंतर 9 व 10 नोव्हेंबर रोजी निवडणुक पथक यांनी निवासस्थानी मतदान केद्रं कार्यान्वित करून जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कोंडय्या जयवंता स्वामी यांच्यासह ८५+ जेष्ठ नागरीकांनी व दिव्यांग मतदारांनी टपाली मतदानाच्या सुविधेचा लाभ घेतला.
नांदेड दक्षिण विधानसभा निवडणुक अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ यांचा आदेशानुसार टपाली मतदान पथकास पर्यवेक्षक एस.एम.देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिएलओ पाटोळे, बी.बी, सुरेवाड पी.जी, रविंद्र पवळे, के.जी.माने, सौ.आर.आर. करडखेले व एस.व्ही.साखरे यांनी सहकार्य केले. यावेळी जवळपास परिसरातील आठ ते दहा जणांनी टपाली मतदानाचा लाभ घेतला आहे.