लोहा विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असतांना अपक्षाचा प्रचार
नांदेड(प्रतिनिधी)-वंचित बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकाची दुहेरी भुमिका काल त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्टपणे समोर आली. नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेतांना नांदेड उत्तर विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार स्टार प्रचारक एकनाथ वाघमारे यांच्यासोबत बसले होते आणि स्वत:वर झालेल्या हल्याबाबत बोलत होते. बॅनर मात्र वंचित बहुजन आघाडीचे अशा दुहेरी भुमिकांमुळे वंचितची खरी पक्ष भुमिका जगाच्या समोर दोन वेगवेगळ्या भुमिकांमध्ये दिसायला लागली आहे.
पर्वा दि.7 नोव्हेंबर रोजी लोहा-विधानसभा निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार चंद्रसेन पाटील यांच्यासोबत वंचितचे स्टार प्रचारक आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे,प्रा. लक्ष्मण हाके यांनी लोहा विधानसभा मतदार संघातील बाचोटी या गावी जातांना आमच्यावर हल्ला झाला असा कांगावा केला. मुळात यांच्यावर हल्ला झाला असता तर त्यांना मार सुध्दा लागला असता. पण त्या ठिकाणी हजर असलेले पोलीस अंमलदार सानप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 189(3), 190, 132, 121(1), 223, 324(4) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 135 नुसार कंधार पोलीसांनी गुन्हा क्रमांक 386/2024 दाखल केला. या प्रकरणातील जवळपास 10 जणांना अटक केल्याची माहिती पोलीसांनी सुध्दा प्रसारीत केली. याचा अर्थ मराठा समाजाने घातलेल्या गोंधळाची दखल घेण्यात आली. पण मराठा समाजाच्यावतीने करण्यात आलेल्या आरोपांवर पोलीसांनी काही एक दखल घेतली नाही.
यानंतर काल दि.8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक एकनाथ वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेतली. याप्रसंगी नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे वंचितचे उमेदवार ऍड.अविनाश भोसीकर, विधानसभा नांदेड उत्तरचे उमेदवार इंजि.प्रशांत इंगोले, वंचितचे जिल्हाध्यक्ष राजेश्र्वर पालमकर, वंचितचे पक्षनिरिक्षक सर्वजित बनसोडे हे हजर होते.
याप्रसंगी नवनाथ वाघमारे यांनी आमच्यावर झालेल्या हल्याबाबत फक्त दहा लोकांना अटक केली आहे. खरे तर 150 लोकांना अटक होणे आवश्यक आहेत. आमच्या मार्गावराला अडवणूक करणाऱ्या मराठा लोकांनी समजून घ्यायला हवे की, ओबीसी युवक सुध्दा मराठ्यांना अडवतील या वाक्याचा थेट अर्थ धमकीच होतो.
यानंतर प्रश्न-उत्तर या भागात बोलतांना पत्रकारांनी त्यांना विचारलेला प्रश्न असा आहे की, लोहा-विधानसभा मतदार संघात वंचितचे उमेदवार शिवा नरंगले असतांना तुम्ही अपक्ष उमेदवार चंद्रसेन पाटील यांचा प्रचार करायला कसे गेलात. त्यावर एकनाथ वाघमारे म्हणाले की, मी वंचित बहुजन आघाडीचा साधा सदस्य सुध्दा नाही. तरी पण मी वंचितचा स्टार प्रचारक आहे. ऍड.बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर ही जबाबदारी दिली आहे. राज्यभरात मी 100 ते 150 विधानसभा मतदार संघात ओबीसी उमेदवारांचा प्रचार करणार आहे. या उत्तरात अनेक अर्थ लपलेले आहेत. वंचित बहुजन आघाडीमध्ये फक्त ओबीसी समाजच आहे काय? आणि इतर समाजाच्या वंचित उमेदवारांचा प्रचार नवनाथ वाघमारे हे करणार नाही यांना स्टार प्रचारक कसे म्हणावे. शिवा नरंगले आणि चंद्रसेन पाटील या बद्दल विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना नवनाथ वाघमारे म्हणाले की, मी कोणाचा प्रचार करावा हा माझा व्ययक्तीक प्रश्न आहे. याचा अर्थ ऍड. बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जबाबदारीला पुर्ण करतांना नवनाथ वाघमारे आपल्या मर्जीचे करणार आहेत असे दिसते आणि यातही ते स्वत:ला वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा स्टार प्रचारक असे स्वत: म्हणतात. यापेक्षा मोठे दुर्देव काय? सोबतच पत्रकार परिषद घेतांना नांदेड उत्तरचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार, लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार पत्रकार परिषदेत हजर दिसतात. पण लोहामध्ये वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असतांना त्याचा प्रचार करण्यात नवनाथ वाघमारे यांना रस नाही. विशेष म्हणजे नांदेड दक्षीण विधानसभेतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या पत्रकार परिषदेत हजर नव्हते. यावरुन नवनाथ वाघमारे यांच्या एकाच पक्षासाठी दिसणाऱ्या वेगवेगळ्या भुमिका वंचित बहुजन आघाडीला काही मिळवून देतील असे दिसत नाही.
शिवा नरंगले हे स्वतः ओबीसी समाजाचे प्रतिनिधी आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. मग नवनाथ वाघमारे मी ओबीसी उमेदवारांचा प्रचार करणार म्हणतात त्यात सुद्धा किती फोलपणा आहे हे दिसते.
संबंधित व्हिडिओ…