नांदेड(प्रतिनिधी)-श्रीकृष्णनगर तरोडा येथे एक बंद घरफोडून चोरट्यांनी 65 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. मौजे नरसी येथून आखाड्यावर बांधलेल्या 20 मोठ्या शेळ्या आणि 6 पिल्ले असे 92 हजार रुपये किंमतीचे पशुधन चोरीला गेले आहे.
शेषराव रामजी कलेटवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिवाळी सणानिमित्त दि.1 नोव्हेंबर 2024 ते 5 नोव्हेंबर 2024 दरम्यान ते गावाकडे गेले होते. त्यांच्या बंद घराची माहिती ठेवणाऱ्या चोरट्यांनी संधी साधली आणि त्यांच्या घराच्या लोखंडी गेटवरून आत प्रवेश करून घराचे मुख्यद्वार तोडले आणि कपाटातील 65 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे चोरून नेले आहेत. भाग्यनगर पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 555/2024 प्रमाणे दाखल केली असून पोलीस अंमलदार तोडसाम अधिक तपास करीत आहेत.
गंगाबाई बालाजी केंद्रे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 3-4 नोव्हेंबरच्या रात्री नरसी येथील अनिल व्यंकटराव यांच्या शेतावर आखाड्यात बांधलेल्या 20 मोठ्या शेळ्या आणि 6 पिले किंमत 92 हजार रुपयांचे पशुधन रोहिदास लक्ष्मण बोंद्रे, साईनाथ लक्ष्मण बोंद्रे आणि हनमंत लक्ष्मण बिजले यांनी चोरून नेले आहेत. रामतिर्थ पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 279 प्रमाणे दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार सुर्यवंशी हे करीत आहेत.