नांदेड(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हा शाखेने 3 गुन्हे उघडकीस आणले आहेत यामध्ये आणखी लोकांना अटक होणार आहे. या पकडलेल्या तिन चोरट्यांकडून 2 लाख 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात रोख रक्कम 10 हजार रुपये आहेत. या चोरट्यांकडून 13 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.
आज दि.4 नोव्हेंबर रोजी पोलीस अधिक्षकांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, लिंबगाव, भाग्यनगर आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली एक जबरी चोरी आणि दोन चोऱ्या असे तिन गुन्हे स्थानिक गुन्हा शाखेने उघडकीस आणले आहेत. त्यात मोहम्मद ईस्माईल अब्दुल हमीद (21) रा.खुदबईनगर चौक, देगलूरनाका नांदेड, मोहम्मद अरबाज मोहम्मद एजाज (19) रा.बालाजीनगर हिंगोलीनाका नांदेड, शेख अयान शेख अमजद(18) रा.नुरी चौक, महेबुबनगर नांदेड या तिन जणांना पकडण्यात आले आहे. आम्ही घेतलेल्या माहितीनुसार यांच्यासोबत अजून बरेच असे चोरटे आहेत. ज्यांना आम्ही पुढे पकडणार आहोत. या चोरट्यांनी लिंबगाव, भाग्यनगर आणि इतवारा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये हे गुन्हे घडविले आहेत. या चोरट्यांकडून खंजीर, तलवारी यांच्यासह एक दुचाकी, रोख रक्कम 10 हजार 13 मोबाईल असा एकूण 2 लाख 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे सांगितले आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष शेकडे, पोलीस अंमलदार देवा चव्हाण, तानाजी येळगे, राजीव बोधगिरे, मोतीराम पवार, अनिल बिरादार, साहेबराव कदम, शेख इजराईल, अकबर पठाण, राजू सिटीकर व दिपक ओढणे सर्वांची नेमणूक विशेष पथकात असे प्रेसनोटमध्ये लिहिले आहे.
ही प्रेसनोट जारी करतांना वेगवेगळ्या शाखांमधील पोलीसांना सोबत घेवून केलेली कामगिरी प्रसारीत करण्यात आली. यामध्ये जेवढी नावे लिहिली आहेत. त्या सर्व नावांसमोर नेमणुक विशेष पथक असे लिहुन पाठीशी घातले जात आहे. म्हणजे स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस अंमलदार यांना गुन्हे उघडकीस आणण्याचे काम येत नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर असेच करायचे असेल तर सर्व विशेष पथकांच्या नावाने एलसीबीची 7/12 करायला काहीच हरकत नसावी.