पत्रकारांच्या सोयीसाठी निवडणुक काळात एसओपी तयार करू-अबिनाशकुमार

नांदेड(प्रतिनिधी)-सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून उद्यापासून निवडणुक होईपर्यंत पोलीस आणि पत्रकार हे आप-आपल्या कामाच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यासाठी आज आम्ही तुम्हाला बोलावले आहे असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी केले.
दिवाळी भेट या निमित्ताने आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी सर्व पत्रकारांना निमंत्रण दिले होते. यावेळी अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक सुशिलकुमार नायक, राखीव पोलीस निरिक्षक विजय धोंडगे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी पुढे बोलतांना अबिनाशकुमार म्हणाले की, उद्यापासून आम्ही आणि आपण सर्व आपल्या कामाच्या रणांगणात उतरणार आहोत आणि विधानसभेच्या निवडणुकींचा निकाल लागल्यानंतर सुध्दा काही दिवस आम्हाला विश्राम मिळणार नाही म्हणून मी माझ्या पोलीस विभागातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आजपर्यत कुटूंबातील आवश्यकतेची कामे पुर्ण करण्यास सांगितले आहे आणि आपल्यासोबत काही काळ घालवून आनंद घेण्यासाठी आपल्याला बोलावले आहे.
निवडणुकीच्या काळात पोलीस आणि पत्रकारांमध्ये समन्वय राहावा यासाठी विमानतळ, व्हीआयपी सभेतील ठिकाण, मतदान केंद्र या ठिकाणी पत्रकारांना प्रवेश सहज मिळावा यासाठी एक एसओपी (स्विकृत कार्यप्रणाली)तयार करणार आहोत. जेणे करून आपल्याला माहिती मिळवणे, वृत्तांकन करणे सहज शक्य होणार आहे. पोलीस ठाणे स्तरावर आपल्याला माहिती देण्यास बद्दलच्या प्रक्रियेत बऱ्याच अडचणी होवू शकतात. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळी माहिती मिळाली तर वृत्तांकनात अडचणी येतील आणि त्यामुळे अनेक समस्या तयार होतील. त्यामुळे तुम्ही जिल्ह्याच्या जनसंपर्क कार्यालयाकडून आपण माहिती घ्यावी जेणे करून कोणताही संभ्रम होणार नाही. यानंतर पोलीस आणि पत्रकारांमध्ये वॉलीबॉल व रस्सीखेच सामना झाला. यावेळी पोलीस वाद्यवृंद पथकाने सुंदर गितांचे सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!