देगलूर येथे तिन घर फोडले ; एक गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-दिवाळीच्या सणानिमित्त आपल्या गावाकडे जाणे देगलूर उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत समन्वयकाला महागात पडले आहे. त्याचे घरफोडून चोरट्यांनी 74 हजारांचा ऐवज लंपास केला आहे.
उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत समन्वयक रमेश शिवाजी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते भक्तापुर रोड येथे सुर्यकांत दासरवाड यांच्या घरात वास्तव्यास आहेत. 31 ऑक्टोबर रोजी ते आपल्या पत्नी व मुलांसह दिवाळीच्या सणासाठी मुळ गाव आंदेगाव तांडा ता.मुखेड येथे गेले होते. आज दि.3 नोव्हेंबरच्या सकाळी घरमालकाच्या नातलगाने मला फोनवरून सांगितले की, तुमच्या घराचे कुलूप तोडलेले आहे. मी येवून तपासणी केली असता 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस 22 हजार रुपयांचे, एक सोन्याची अंगठी 6 ग्रॅमची किंमत 20 हजार रुपये आणि 10 हजार रुपये रोख रक्कम असा 52 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. तसेच मी ज्या इमारतीत राहतो. त्या इमारतीतील दुसरे किरायेदार नारायण माणिकराव शिंदे यांच्या घरातील लहान मुलाची सोन्याची अंगठी, कानातील रिंग 4500 रुपये किंमतीचे आणि रोख रक्कम 7500 असा 12 हजारांचा ऐवज चोरण्यात आला आहे. तसेच संतोष मठपती यांच्या घरातील चांदीचे वाळे 1500 रुपयांचे व रोख रक्कम 8500 रुपये असा 10 हजारांचा ऐवज चोरी गेला आहे.या तिन चोऱ्यांच्या घटनेत एकूण 74 हजारांचा ऐवज लंपास झाला आहे. देगलूर पोलीसांनी या तिन चोऱ्यांचा घटनेचा एक गुन्हा भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(4), 305 नुसार क्रमांक 522/2024 वर नोंदवला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक इंद्र्राळे हे करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!