नांदेड(प्रतिनिधी)-निवडणुक आयोगाने महाराष्ट्रातील मुंबई-मिरा-भाई-वसई-विरार या पोलीस आयुक्तालयांमधील पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांबाबत नाराजी दाखवल्यानंतर आता निवडणुकी प्रक्रिया सुरू झाली. या परिस्थितीत आज राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या मान्यतेनंतर आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक के.एम.मल्लीकार्जुन प्रसन्ना यांनी मुंबईतून 221 पोलीस निरिक्षकांना बाहेर काढले आहे आणि त्या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी 42 पोलीस निरिक्षकांना मुंबई शहरात आणले आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीपुर्वी घेतलेल्या बैठकीत मुंबई शहरात आणि मिरा-भाईंदर-वसई-विरार या पोलीस आयुक्तालयामध्ये निवडणुकांना अपेक्षीत नियमावलीप्रमाणे बरेच पोलीस निरिक्षक अद्याप कार्यरत असल्याचे दिसल्यानंतर त्यांना त्वरीत प्रभावाने बदलण्याची सुचना केली होती. त्यानुसार मुंबई शहर आणि मिरा-भाईंदर-वसई-विरार या दोन पोलीस आयुक्तालयामधून 221 पोलीस निरिक्षकांना बाहेर काढण्यात आले आहे. काही नवी मुंबईमधून बाहेर काढले आहेत. बहुतांश पोलीस निरिक्षकांना अकार्यकारी शाखेमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. मुंबई शहरातील काही पोलीस निरिक्षकांना मिरा-भाईंदर-वसई-विरार या पोलीस आयुक्तालयात पाठविले आहे. काही जणांना पोलीस प्रशिक्षण केंद्रात पाठविले आहे. त्यानुसार मुंंबई शहरातून बरेच पोलीस निरिक्षक बाहेर गेल्यामुळे मुंबईमध्ये 42 नवीन पोलीस निरिक्षकांना आणले आहे. मुंबईत येणारे बहुतेक पोलीस निरिक्षक राज्यातील वेगवेगळ्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आहेत.
वाचकांच्या सोयीसाठी बदली झालेल्या 263 पोलीस निरिक्षकांच्या बदल्यांची पीडीएफ संचिका जोडली आहे.
PI Badlya Election Order 30.10.2024