नांदेड(प्रतिनिधी)-अर्धापूर येथे तीन जणांनी सोयाबीनचे 15 पोते चोरून नेत असतांना त्यांना विचारणा केली तेंव्हा शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
आताखान इसाखान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 ऑक्टोबरच्या दुपारी 4 वाजता त्यांच्या शेतातील 15 पोते सोयाबीन ट्रॅक्टर क्रमांक एम.एच.24 बी.एल.8291 मध्ये असल्यानंतर त्यांनी सोयाबिन चोरून नेता का अशी विचारणा केली असतांना चोरट्यांनी गुन्हा दाखल करू नकोस नाही तर तुला जिवे मारु अशी धमकी दिली. आता खानच्या तक्रारीवरुन अर्धापूर पोलीसांनी तजम्मुल खान इसा खान, मुजम्मिल खान इसा खान, आणि ट्रक चालक शेख मजिद शेख आबास विरुध्द गुन्हा क्रमांक 562/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार आडे हे करीत आहेत.