पीएफआय संघटनेच्या दोन सदस्यांचा जामीन अर्ज फेटाळला

नांदेड(प्रतिनिधी)-दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी पापुलर फ्रंट ऑफ इंडिया(पीएफआय) या संघटनेने तयार केलेले साहित्य आणि जमावासमोर केलेले भाषण हे अभिलेखावर उपलब्ध असतांना खटला दरम्यान त्यांना जामीन देणे हा पुर्वग्रह होईल असे नमुद करून पहिले अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी पीएफआयच्या दोन जणांना जामीन नाकारला आहे.
29 ऑक्टोबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड समोर धरणे आंदोलनात वेगवेगळ्या शब्दांद्वारे दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे वक्तव्य केल्याप्रकरणी दहशतवादी विरोध पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षकाने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबई येथील काळा चौकी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 22/2022 दाखल झाला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 121(ए), 153(ए), 109, 116, 201, 120(ब) आणि अनलॉफुल ऍक्टीव्हीटीज्‌(प्रिव्हेन्शन) ऍक्ट 1967 अर्थात युएपीएतील कलम 13(1)(ब) जोडलेली होती. या प्रकरणी पोलीसांनी एकूण 6 आरोपींना अटक केली होती. त्यानंतर तपास पुर्ण करून एटीएस पथकाने त्यांच्याविरुध्द विशेष खटला क्रमांक 31/2023 दाखल केला.
या प्रकरणातील सहा आरोपींपैकी मोहम्मद निसार अब्दुल रशिद, मोहम्मद अब्दुल करीम मोहम्मद अब्दुल हलीम या दोघांनी भारतीय नागरीक संहिता 2023 मधील कलम 483 प्रमाणे खटल्यादरम्यान जामीन अर्ज सादर केला. या अर्जाचा निकाल देतांना अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी आज उपलब्ध असलेल्या साक्षीदारांचे जबाब, मोबाईल फोनचे सीडीआर आणि एसडीआरवरुन आरोपींचे संबंध पीएफआय संघटनेशी आहेत ते त्या संघटनेचे सदस्य आहेत. असे सतकृतदर्शनी दिसते . तसेच दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य या लोकांनी केले आहेत. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे खटला सुरू असतांना त्यांना जामीन देणे हा पुर्वग्रह होईल कारण सरकार पक्ष आणि आरोपी पक्ष या दोघांना खटला चालवितांना त्याचा प्रभाव पडेल म्हणून या दोन आरोपींनी मागितलेली जामीन फेटाळण्यात आली आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड . यादव तळेगावकर यांनी सादरीकरण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!