महाराष्ट्र पोलिसांच्या सन्मानार्थ”एक दिवा खाकी वर्दीसाठी’; निबंध स्पर्धा

महाराष्ट्र पोलिसांना समर्पित अंजनी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम…
नांदेड (प्रतिनिधी)-पोलीस हा एक असा सैनिक आहे, जो कायम नागरिकांच्या, समाजाच्या, कायद्याच्या रक्षणासाठी तैनात असतो. सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचे 24 तास संरक्षण करणाऱ्या सैन्यदलातील सैनिकांसारखेच पोलीसही डोळ्यात तेल घालून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तत्पर असतात. गुन्हेगारांना शिक्षा होईल इतपत तपास करणे आणि सर्वसामान्यांना स्वातंत्र्याची अनुभूती घेता येईल असे वातावरण निर्माण करणे यासाठी पोलीस नेहमीच बंदोबस्तावर राहुन त्यासाठी तत्पर असतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांबद्दल आदरयुक्त भीती असते. अशा या पोलिसांबाबत बालवयातील विद्यार्थ्यांच्या मनात एक विशिष्ट प्रतिमा तयार झालेली असते. अगदी बालवाडी ते 10 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील पोलिसांचे आकर्षण असते. शालेय मुलांच्या विचारांना आकार देण्याकरिता अंजनीआई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा संचलित अंजनी फाऊंडेशन जालना आयोजित “एक दिवा खाकी वर्दीसाठी’ या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या मनातील पोलीस नेमका कसा आहे, यावर एक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
इयत्ता 5 वी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

चला तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, लिहिते व्हा.
पाचवी ते सातवी लहान गटनिबंधाचा विषय :-
1 ) पोलीस माझा मित्र.. शब्द मर्यादा 200 शब्दात लिहणे
आठवी ते दहावी मोठा गटनिबंधाचा विषय:-
2 ) पोलीस नसते तर…! शब्द मर्यादा :300 शब्दांत लिहिणे
अकरावी ते पदवी मोठा गटनिबंधाचा विषय:-
1)आमचा सुरक्षारक्षक पोलीस.. किंवा खाकी वर्दीचे स्वप्न शब्द मर्यादा500 शब्दात लिहणे
मान्यवरांच्या हस्ते बक्षीस स्वरूपात रोख रक्कम देण्यात येईल….
लहान गट…पाचवी ते सातवीप्रथम बक्षीस:- 701, द्वितीय बक्षीस:- 501, तृतीय बक्षीस:- 301, दोन उत्तेजनार्थ :-151
मोठा गटआठवी ते दहावीप्रथम बक्षीस:- 1001, द्वितीय बक्षीस:- 701, तृतीय बक्षीस:- 501, दोन उत्तेजनार्थ :-351,
मोठा गट अकरावी ते पदवी प्रथम बक्षीस:- 5001,द्वितीय बक्षीस:- 3001,तृतीय बक्षीस:- 2001,दोन उत्तेजनार्थ :-551,
निबंध स्पर्धेचे नियम1) स्पर्धेत सहभागी होणारा विद्यार्थी तो शिक्षणाच्या प्रवाहात असावा. 2)शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.3) स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय 25 वर्षापर्यंत राहील.4) निबंध लिहिताना दिलेल्या अक्षराची मर्यादा बंधनकारक राहील.5) निबंध लिहिताना रोलिंग पेज चा वापर करावा.निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी रोलिंग पेजवर स्वतःचे पूर्ण नाव:-………पत्ता :-……….शाळा/विद्यालयाचे नाव:- ………..कुटुंबातील दोन व्यक्तीचे कॉन्टॅक्ट नंबर:-………..व्हाट्‌सअप क्रमांक:-……..पासपोर्ट साईज फोटो:-…….आधार क्रमांक:-………….6)निबंध स्व:अक्षरात, सुंदर व सुटसुटीत शब्दात लिहिणे आवश्यक नोट:-अर्धवट पत्ता, अपूर्ण माहितीअसणाऱ्या निबंधाचा विचार केला जाणार नाही.अक्षर न समजणाऱ्या निबंधाचा विचार केला जाणार नाही.दिलेल्या तारखेपर्यंत सर्व निबंधजमा करणे बंधनकारक राहील.ठरवलेल्या तारखेच्या नंतर आलेल्या निबंधाचाविचार केला जाणार नाही.ङ्गनिबंध स्पर्धेचा पारितोषिक फेरबदल याचे संपूर्ण अधिकार अंजनी फाउंडेशन कडे राखीव आहेत.
निबंध स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची शेवटची तारीख 5 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत निबंध जमा करावेत.निबंध जमा करण्याचे ठिकाण :-अंजनी फाउंडेशन शाखा नांदेडज्ञानार्जन कोचिंग क्लासेस, मुक्तेश्वर आश्रमा समोर, वसंत नगर नांदेड गणेश पेडग मो.नं. 77220 02224, ज्योती आडेकर मो.नं.9168567111.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!