नांदेड-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आयोजितकेंद्रीय युवक महोत्सवात लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबादच्या नाट्यसंघाने सुप्रसिध्द लेखिका रेखा बैजल लिखित आणि सुप्रसिध्द लेखक,दिग्दर्शक डॉ. विलासराज भद्रे दिग्दर्शीतएक वास्तववादी आणि ज्वलंतए कांकिका ‘ आदिम ‘ अत्यंत प्रभावीपणे सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.ह्या एकांकिकेसाठी प्रा.मोईन शेख यांनी सहदिग्दर्शन केले.सर्व कलावंतांचा अत्यंत दमदार अभिनय,अप्रतिम प्रकाश योजना,उत्कृष्ट संगीत,उत्कृष्ट नेपथ्य,वेशभूषा,रंगभूषा आणि प्रगल्भ दिग्दर्शनामुळे ह्या एकांकिकेने आपली छाप टाकली.ग्रामीण भागातून आलेल्या ह्या कलावंतांनी अत्यंत प्रतिकूल वातावरण,समोर नामांकित शहरी महाविद्यालयाचे बलाढ्य संघ,पाठीमागे कोणतीही शक्ती नसताना स्पर्धेत आपली गुणवत्ता पूर्ण क्षमतेने सिद्ध केली आणि रसिकमने जिंकली. सहयोग कॅम्पस आयोजित ह्या युवक महोत्सवातील ‘ कै.जयवंत दळवी ‘ रंगमंचावर सादर झालेल्या ह्या एकांकिकेतील सृष्टी साखरे (तरुणी) हिने नायिकेची मध्यवर्ती भूमिका प्रचंड ताकदीने साकारत आपल्या विविध कंगोरे असलेल्या भूमिकेचे सोने केले.
एकांकिकेतील जय विकास गायकवाड (तरुण) अश्विनी लखपती (स्त्री),निखिल भेरजे(महाजन),नागेश वाघमारे (साधू) ह्यांच्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांना अक्षरशः खिळऊन ठेवले.त्यांना वैष्णवी काळे, ईश्वर सोनटक्के,माधव सर्जे,विलास आडपोड, ह्यांनी सुंदर साथ दिली.ह्या एकांकिकेतील आशयघन प्रकाश योजना अश्विनी लखपती,वास्तववादी नेपथ्य निखिल भेरजे,अप्रतिम संगीत अविनाश तुंटे,वेशभूषा वैष्णवी काळे,रंगभूषा अश्विनी अटलोड ह्यांनी केली.त्यांना सुप्रसिध्द प्रकाश योजनाकार प्रा.कैलास पूपुलवार,सुप्रसिध्द संगीतकार राहुलकुमार मोरे ह्यांचे मार्गदर्शन आणि आरेखन लाभले.ह्या एकांकिका निर्मितीस प्राचार्य डॉ.कमलाकर कणसे ह्यांची प्रेरणा,विशेष सहकार्य सुप्रसिध्द दिग्दर्शक,अभिनेते डॉ. विजयकुमार माहुरे ह्यांचे लाभले.तर नाट्य संघ समन्वयक म्हणून प्रा.डॉ.राम शेवलीकर ह्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली.एकांकिका यशस्वितेसाठी प्रा.साईप्रसाद देशमुख,सत्यपाल नरवाडे,सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका,विद्यार्थी ह्यांनी मोलाची साथ दिली.स्त्री आणि पुरुष ह्यांच्यातील निस्सीम प्रेम, टोकाचा वैचारीक संघर्ष , विज्ञाननिष्ठा आणि पाखंड, स्त्री – पुरुष तुलना,अहंकार,त्यातील मानसिक द्वंद्व ह्याचे आदिम काळ ते वर्तमान ह्यातील अस्वस्थ प्रवासाचे चित्रण ह्या एकांकिकेत होते.
हा प्रवास पूर्व आहे की पश्चिम आहे ? प्रारंभिक आहे की अंतिम आहे ?सत्य आहे की मृगजळ ? ह्याची उकल पाहताना स्वतः रसिक अंतर्मनातून जणू त्या तरुण – तरुणीच्या सोबत निघून आपापला सूर्य शोधू लागतात,हा नाट्यानुभव कमालीचा आत्मशोध देणारा ठरला.आणि एकांकिकेने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले.