नांदेड (प्रतिनिधी)-डॉ.इकबाल उर्दु मॉडेल हायस्कुल अर्धापूर येथे एका व्यक्तीची 16 लाखांची फसवणूक झाल्याप्रकरणी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ.इकबाल उर्दु मॉडेल हायस्कुल मध्ये नोकरीस असलेल्या पठाण मजहर असद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 30 ऑगस्ट 2022 ते 10 नोव्हेंबर 2023 दरम्यान हायस्कुल संचालकांमधील सय्यद वसीम बारी सय्यद शमशोद्दीन, सय्यद जाकेर अली सायद अली, इकबाल अहेमद अब्दुल समद आणि फयाजोद्दीन अकबरोद्दीन अन्सारी या चार जणांनी पठाण यांच्याकडून 16 लाख रुपये घेवून बनावट हजेरी पट तयार करून तो बनावट दस्तऐवज खरा असल्याचे भासून त्यांची 16 लाख रुपयांना फसवणूक केली आहे. अर्धापूर पोलीसांनी हा घटनाक्रम भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 468, 470, 471 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 560/2024 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास अर्धापूरचे पोलीस निरिक्षक चंद्रशेखर कदम हे करीत आहेत.