किनवट येथे दोन घरफोडून 5 लाखांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-किनवट येथे एकापेक्षा जास्त घरे फोडून चोरट्यांनी 5 लाख 2 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
इस्लामपुरा किनवट येथील शेख हमीद शेख खाजा कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 ते 17 ऑक्टोबर सकाळी 8 वाजेदरम्यान शेजारी घरांना कुलूप लावून बाहेर गावी गेल्याची संधी चोरट्यांनी साधली आणि त्यांच्या आणि शेजारच्या घरातून कडीकोंडा तोडून त्यांच्या घरातील सोने-चांदी व रोख रक्कम असा 1 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. तसेच त्यांचे शेजारी अब्दुल फारुख अब्दुल समद यांच्या घरातील सोन्या-चांदीचे व रोख रक्कम असे 3 लाख 20 हजार रुपयांचे साहित्य चोरले आहे. किनवट पोलीसांनी या दोन घटनांचा एक गुन्हा क्रमांक 312/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक मामीडवार यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!