नांदेड :- दिपावली सण 2024 अनूषंगाने तात्पुरता फटाका परवाना देण्याबाबत अंशतः बदल करण्यात आला असून बुधवार 23 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
वर्ष-2024 मध्ये दिपावली उत्सव 28 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत साजरा होत आहे. त्यानुषंगाने नांदेड महानगरपालिका हद्दीतील तात्पुरता फटाका परवाना सेतू समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांच्यामार्फत व जिल्हयातील उपविभागीय कार्यालयामार्फत त्यांच्या कार्यक्षेत्रातील तात्पुरते फटाका परवाना अर्ज विस्फोटक अधिनिमय 2008 नुसार तात्पुरते फटाका परवाना अर्ज विक्री व स्विकारण्याच्या कालावधीची मुदतवाढ 23 ऑक्टोबर पर्यत देण्यात आली आहे. याव्यतीरिक्त 3 ऑक्टोबर रोजी दिलेले जाहीर प्रगटनामधील अटी व शर्ती कायम राहतील, असे जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.