कुलकर्णीने मागितली 50 हजारांची खंडणी नाही तर तुझ्या बातम्या लिहितो; गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-आधार कार्डात संगणकामुळे झालेली चुक विषय करून तुझ्या बातम्या छापतो अशी धमकी देवून 50 हजारांची खंडणी मागणाऱ्या पत्रकाराविरुध्द एका सेविका महिलेने तक्रार दिल्यानंतर वजिराबाद पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
एका शाळेतील सेविका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वय आज 58 वर्ष आहे, अर्थात त्यांची सेवा समाप्तच होणार आहे. अशा परिस्थितीत पत्रकार सखारामपंत रघुनाथ कुलकर्णी या पत्रकाराने दि. 19 मार्च 2024 रोजी त्यांची भेट घेवून सांगितले की, तुमच्या आधार कार्डामध्ये तुमचे वय 82 वर्ष आहे. याबद्दल मी बातमी लिहितो आणि तसे करायचे नसेल तर मला 50 हजार रुपये द्यावे लागतील. याबद्दल त्या सेविका महिलेने माझे जन्म वर्ष आधार कार्डावर चुकीने पडलेले होते ते आम्ही दुरूस्त केलेले आहे. पण नादुरूस्त असलेले कार्ड माझ्या सेवासंचिकेत लागलेले आहे. सखारामपंत रघुनाथ कुलकर्णी याने मला माझे नादुरुस्त असलेले आधार कार्ड दाखवून मला बातमीची भिती दाखवली आणि 50 हजार रुपये मागितले. त्यावेळी मला भिती वाटल्याने मी आज तक्रार देत आहे. सखारामपंत ने मला खोट्या तक्रारी करतो म्हणून सुध्दा खंडणीची मागणी केलेली आहे. त्याविरुध्द कार्यवाही व्हावी. हा सर्व प्रकार नांदेड शहरातील धर्मदाय आयुक्त कार्यालय आणि न्यायालयात घडलेला आहे.
13 ऑक्टोबर रोजी वजिराबाद पोलीसांनी या तक्रारीनुसार गुन्हा क्रमांक 502/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेचे कलम 385 जोडलेले आहे. कलम 385मध्ये तिन वर्षापर्यंतची शिक्षा प्रस्तावित आहे. बातम्या लिहितो म्हणून मागितलेली खंडणी ही पत्रकार क्षेत्राला काळीमा फासणारी आहे. या महिलेच्या आधार कार्डमध्ये 82 वर्ष वय आहे. तर त्या महिला नोकरीला राहुच शकत नाहीत आणि त्या संस्थेने त्यांना नोकरीवर ठेवलेले आहे. म्हणजे त्या संस्थेने सुध्दा तपासणी केली असणारच मग पुन्हा एकदा सआदत हसन मन्टो यांचे वाक्य आठवते. ते सांगतात,”एक बिका हुवा पत्रकार और वेश्या एक ही श्रेणी में आते है । उस में भी वेश्या की श्रेणी उची होती है ।’ शिक्षीकेचा नवरा असलेल्या सखारामपंतने 50 हजारच मागितले. आजच्या जगात 7 आकडी रक्कम मागणारे पत्रकार सुध्दा आहेत. सध्या दिवाळी आहे. लगेच निवडणुक येणार आहे म्हणून ही तर पत्रकारांची सुगी आहे. म्हणजे आता धंदा करायला संधी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!