नांदेड(प्रतिनिधी)-एका शैक्षणिक संस्थेत वयाची अट पुर्ण न करणाऱ्या अल्पवयीन बालकाला संस्थेचे सदस्य बनवले आणि एका महिला शिक्षीकेला तोंडी आदेशावर कामावरून कमी करून त्यांचे 15 लाख रुपये घेतले आहेत. या प्रकरणी अर्धापूर पोलीसांनी संस्था चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
डॉ.एकबाल उर्दु मॉडल हायस्कुल अर्धापूर येथे कधी शिक्षीका असलेल्या आयशा खान अफसर खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाळेचे सदस्य सय्यद वसीम उर्फ बारी सय्यद शमशोद्दीन रा.लेबर कॉलनी नांदेड हे 14 ऑगस्ट 1990 रोजी 15 वर्ष वय असतांना डॉ.एकबाल उर्दु शाळेचे सदस्य झाले. 30 जुलै 1975 रोजीच्या त्यांच्या शाळेच्या टी.सी.मध्ये ते नमुद आहे. धर्मादाय आयुक्त नांदेड यांना ही बाब निर्दशनास न आणून देता सदस्यत्व दाखल करून शासनाची फसवणूक केली आहे. न्यायालयाची अहवेलना व अपमान केला आहे. आयशा खान यांची वैयक्तीक मान्यता व अनुदान मंजुर करून वेतन सुरू करण्यासाठी 15 लाख रुपये घेतले. पैसे मागण्यासाठी शाळेत गेले असतांना कोणतेही शैक्षणिक काम करू न देता शिक्षीक हजेरी पटावर स्वाक्षरी करण्यापासून रोखले आणि नोकरीवरुन काढून टाकले असे तोंडी सांगून सेवा समाप्त केली आणि माझी 15 लाखांची आर्थिक फसवणूक केली. अर्धापूर पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471 प्रमाणे गुन्हा क्रमांक 538/2024 दाखल केला असून या गुन्ह्याचा तपास अत्यंत कर्तव्य कठोर पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम हे करणार आहेत.