सोयाबीन शेंगा खाल्याने खानजोडे परिवारातील आठ सदस्यावर विषबाधा ;एका चिमुकलीचा मुत्यु

नवीन नांदेड (प्रतिनिध)- सिडको परिसरातील खानजोडे कुंटुबांनी सोयाबिन शेंगा ऊकळुन खाल्याने कुंटुंबातील आठ सदस्यावर विषबांधा झाली. यात एक चिमुकली मृत झाल्याची घटना दि. 5 रोजी घडली.उपचारा दरम्यान मिरा खानजोडे (14) चिमुकलीचा मृत्यु झाल्याची माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तर उर्वरीत सदस्याची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी ग्रामिण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युुची नोंद करण्यात आली.
सिडको परिसरातील जय भवानी नगर एन.डी.41 भागात गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नामदेव खानजोडे हे आपल्या भावासह रहात होते.काका बबन खानजोडे हे मिस्त्री काम करत असल्याने ते कामानिमित्याने काजांळा तांडा येथे दि.4 रोजी गेले होते. त्यांनी तेथील एका शेतातून सोयबीन शेंगा घरी घेवुन आले. त्या शेंगा ऊकळुन खाल्ल्यानंतर खानजोडे परिवारातील जवळ पास आठ सदस्यांना सायंकाळी उलटया व संडास होत असल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती जास्तच खालावत असल्याने त्यांना विष्णुुपुरी येथील रुग्णालयात हलवण्यात आले.दि 5 रोजी सायकाळी उपचारा दरम्यान इंदिरा गांधीं हायस्कूल येथे आठवी इयत्ते शिकणाऱ्या मिरा नामदेव खानजोडे वय 14 वर्ष हिचा मृत्यू झाला. मृतदेहाची उत्तर तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले.तिच्यावर दि. 6 रोजी सिडको येथील वैकुठधाम स्मशानभुमित सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यात शोभा नामदेव खानजोडे (50), स्नेहल शिवाजी तलवारे (13),बबन शंकरराव खानजोडे (57),अनिल बबन खानझोडे (35), जानू अनिल खानजोडे (27), नामदेव ऊकंडजी खानजोडे व सोनाली नामदेव खानजोडे ( 18) ह्यांच्यावर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु असुन त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहीती वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी अन्न भेसळ विभागाच्यावतीने कोणतीच तपासणी केली नसल्याचे समोर आले आहे. हि विषबांधा कोणत्या कारणामुळे झाली हे माञ समजु शकले नाही. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असल्याची माहीती पोलीस निरीक्षक ओमकांत चिचोलंकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!