नांदेड(प्रतिनिधी)-गुन्हा घडल्यानंतर 12 तासात विमानतळ पोलीसांनी दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, दुचाकी गाड्या असा 3 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन चोरट्यांसोबत दोन विधीसंघर्षग्रस्त बालके सुध्दा विमानतळ पोलीसांनी आपल्या ताब्यात घेतली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी खंजीरचा धाक दाखवून एका व्यक्तीकडून काही चोरट्यांनी 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल बळजबरी चोरून नेला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 405/2024 दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास करतांना विमानतळ पोलीसांनी शेख ईलियास शेख इरफान (23) रा.पाकिजानगर नांदेड, मोहम्मद फेरोज मोहम्मद हमीद(19) रा.देगलूरनाका नांदेड या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी आपण गुन्हा केल्याची कबुली दिली आणि आमच्यासोबत दोन विधीसंघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती दिली. विमानतळ पोलीसांनी या चोरट्यांकडून बळजबरीने चोरलेला मोबाईल, दोन दुचाकी गाड्या असा एकूण 3 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमालासह खंजीर जप्त केला आहे. दोन सज्ञान चोरट्यांना विमानतळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. दोन चोरटे फरार आहेत.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांनी विमानतळचे पोलीस निरिक्षक गणेश चव्हाण, पोलीस उपनिरिक्षक विनोद साने, पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, शेख जावेद, शेख शोयब, राजेश माने, हरप्रितसिंघ सुखई, नागनाथ स्वामी, दिगंबर डोईफोडे, गोरख भोसीकर यांचे कौतुक केले आहे.