23 लाख 40 हजार 500 रुपयांचे मिसिंग 150 मोबाईल पोलीसांनी शोधले

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागाने जनतेचे गहाळ झालेले 23 लाख 40 हजार 500 रुपये किंमतीचे 150 मोबाईल शोधून पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या हस्ते मालकांना परत दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी, आठवडी बाजार आदी ठिकाणातून जनतेचे अनेक मोबाईल गहाळ होतात. या संदर्भाने पोलीस विभाग मिसिंग दाखल करत असते. नांदेड जिल्हा सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक धीरज चव्हाण आणि त्यांच्या पथकाने जिल्ह्यातून गहाळ झालेले 150 मोबाईल ज्यांची किंमत 23 लाख 40 हजार 500 रुपये आहे. ते हस्तगत केले. आज पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते ते मोबाईल अनेक मालकांना परत करण्यात आले. शोध लागलेल्या मोबाईलचे IMEI क्रमांची माहिती Nanded Police  या Facebook Page  व Twitter वर प्रसारीत करण्यात आली आहे. नागरीकांनी आपल्या हरवलेल्या मोबाईलचा IMEI नंबर ओळखून सायबर पोलीस ठाण्यातून आपला मोबाईल घेवून जावा असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे, सुरज गुरव, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, सायबरचे पोलीस निरिक्षक धिरज चव्हाण आदींनी ही कार्यवाही करणारे पोलीस उपनिरिक्षक एम.बी.चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेश वाघमारे, राजेंद्र सिटीकर, दिपक ओढणे, दाविद तिडगे, मोहम्मद आसिफ, विलास राठोड, काशिनाथ कारखेडे, किशोर जयस्वाल, मोहन स्वामी, दिपक शेवाळे, राज यन्नावार, व्यंकटेश सांगळे, दिपक राठोड यांचे कौतुक केले आहे. पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, CEIR या पोर्टलवर जनतेने आपला गहाळ झालेल्या मोबाईलची माहिती अपेड करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!