हुतात्मा पानसरे हायस्कूलच्या १९७४ बॅचच्या विद्यार्थीचा स्नेह मिलन सोहळा

धर्माबाद,(प्रतिनिधी)-येथील हुतात्मा पानसरे हायस्कूलच्या १९७४ बॅचचे ५५ माजी विद्यार्थी स्नेहमीलन सोहळ्यासाठी माहेश्वरी भवन येथे २८ व २९ सप्टेंबर २०२४ ला स्नेह  मिलन कार्यक्रमास एकत्र आले होते. २८ सप्टेंबर रोजी ९ वाजता सर्वजण आले. सर्वजण एकेरी नावाने आवाज देवून भेट घेत होते. ५० वर्षानंतर भेटीची आत्मीयता सर्वानी अनुभवली. ११ वाजता सर्वानी ५० वर्षानंतर आपला जीवन प्रवास आणि नौकरीतील विभाग परिचय दिला. सध्याचे वास्तव्य स्थान सांगितले व येण्याचा आग्रह केला.
संध्याकाळी श्रीक्षेत्र बासरला श्री सरस्वती देवी दर्शन तसेच श्री गोदावरी आरती सोहला दर्शन अनुभवला. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, व्यक्तिगत गायन कला कार्यक्रम झाला. २९ सप्टेंबर २०२४ ला सर्व माजी विद्यार्थी बॅच लावून आपल्या हुतात्मा पानसरे हायस्कूलला आले. सर्वांचे स्वागत विश्वस्त विश्वनाथ पाटील बन्नाळीकर व मुख्याध्यापक बेंबरेकर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते. सर्व माजी विद्यार्थी यांनी हुतात्मा पानसरे यांच्या पुतळयास पुष्प अर्पण केले, नंतर समाधी स्थळी पुष्प अर्पण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुसलवाड यांनी केले. शाळेतील मुलामुलीनी राष्ट्रगीत, हुतात्मा पानसरे गीत छान गायले. कार्यक्रमास प्रमुख शिंदे होते. जाधव व गोलेगांवकर, विश्वस्त विश्वनाथ पाटील  बन्नाळीकर, रामचंद्र पाटील बाळापुरकर, मुख्याध्यापक बेंबरेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
शाळेतर्पेâ सर्व माजी विद्यार्थी यांना शाल, स्मृतिचिन्ह, गुलाब पुष्प देवून नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. माजी विद्यार्थी आपल्या अ ब क  तुकडी वर्गात ५० वर्षानंतर प्रवेश करताना अतिशय भावुक झाले होते, सर्व माजी विद्यार्थी यांनी विश्वस्त विश्वनाथ पाटील  व मुख्याध्यापक बेंबरेकर यांना शाळेविषयीची आत्मीयता अशीच कायम राहणार याची ग्वाही दिली.
नंतर माहेश्वरी भवन येथे सर्वानी सुरेख भोजनाचा आस्वाद घेतला. दुपारी ३ वाजता ५० वर्षानंतरची भेटीनंतर निरोपाप्रसंगी सर्व जण भावुक होवून आपापल्या गावी परतले.
निवास,नाश्ता, भोजनाची सर्व व्यवस्था अप्रतिम करण्यात आली होती व्यासपीठावर प्रमुख पाहुणे शिंदे,  गोळेगांवकर, जाधव, सचिव विश्वनाथ पाटील बन्नाळीकर, कोषाध्यक्ष रामचंद्र पाटील बाळापुरकर, संचालक कैलाश ईनाणी, संचालक दिनेश सारडा, मुख्याध्यापक बेंबरेकर उपस्थित होते. याप्रसंगी १९७४ च्या बॅचचे ५७ माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!