नांदेड(प्रतिनिधी)-वनजमीनीचा पट्टा शेती करून खाण्यासाठी दिला असतांना किनवट तालुक्यातील डोंगराळ भागातील काही गावांमध्ये काही शेतकऱ्यांनी त्याच्यावर गांजा उगवला. आज पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनात भोकरचे अपर पोलीस अधिक्षक डॉ.खंडेराय धरणे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक आणि त्यांचे स्वत:चे पोलीस अंमलदार यांनी धाड टाकली. सकाळपासून सुरू असलेला धाड सत्राचाा कार्यक्रम अद्यापही सुरू आहे. पोलीसांनी तेथे लाईटची सोय करून गांजाची मोजणी करत आहेत.
पोलीसांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज पोलीसांनी किनवट तालुक्यातील डोंगरगाव आणि दिग्रस या भागात अत्यंत गुप्तपणे प्रवेश केला. अनेक टेकड्या पार करून पोलीस तेथे पोहचले आणि गांजाची लागवड असलेल्या शेतीजवळ वेडा टाकला. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक यांच्यासह त्यांचे पथक दिग्रस आणि डोंगरगाव येथे गेले आणि गांजाची झाडे ज्यांच्या शेतात लावली आहेत. त्या लोकांचा शोध घेत आहेत. सकाळपासून सुरू असलेल्या या गांजा धाड सत्राची कार्यवाही सुर्यास्तानंतर सुध्दा संपलेली नाही. रात्रीच्या अंधारात तेथे त्रास होईल म्हणून पोलीसांनी उजेडाची सोय सुध्दा केलेली आहे आणि वेगवेगळ्या वनजमीनींच्या पट्यांची तपासणी सुरू आहे. गांजाची झाडे दिसू नये म्हणून त्या गांजांच्या झाडांना शेतकऱ्यांनी इतर पिकांच्या मध्ये उगवले आहे. पण सुतावरुन स्वर्ग गाठणाऱ्या पोलीसांनी ही गांजाची झाडे शोधली आहेत. आतापर्यंत गांजाची मोजदाद सुरू असल्याने गांजाचे पुर्ण वजन कळाले नाही. पण गांजाचे वजन जास्तच असणार कारण गांजाची जीवंत झाडे पोलीसांनी पकडली आहेत आणि ती झाडे शेतात असल्याने ते झाडे ओली असतात आणि त्यांचे वजन जास्तच असते. पोलीसांनी केलेल्या या कार्यवाहीचे कौतुक करायलाच हवे.
रक्षक निघाला भक्षक
डोंगरगाव आणि दिग्रस ता.किनवट येथे वन विभागाच्या जमीनीमध्ये शेती करून अन्य धान्य पिकवण्याऐवजी शेतकऱ्यांनी त्यात गांजाची झाउे पिकवून लवकर श्रीमंतीकडे वाटचाल केली. या वाटचालीतील म्होरक्या किनवट तालुक्यातील एक पोलीस पाटील असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. पोलीस पाटलांची नियुक्ती यासाठीच केली असते की, गावा-गावात होणाऱ्या भानगडी, अवैध धंदे याबद्दलची माहिती पोलीसांना देणे ही त्याची जबाबदारी असते. आता रक्षकच भक्षक निघाला त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी सुध्दा आपल्या शेतांमध्ये अर्थात वन जमीनीमध्ये गांजाची झाडे उगवून श्रीमंतीकडे जाण्याचा तयार केलेल्या वाटेवर पोलीस कार्यवाहीने अडथळे आले आहेत.