आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्यजीत टिप्रेसवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार व सन्मान 

 

नांदेड- दै.वीर शिरोमणी, सा. नंदगिरीचा कानोसा व मायडी बहुउदेशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ” मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा ” राज्यस्तरीय पुरस्कार -2024 ” कार्यक्रम आज दि. 29 सप्टेंबर रोजी हॉटेल गणराज पॅलेस, नमसकार चौक, नांदेड येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष कंधार लोहा मतदार संघाचे मा. आमदार ईश्वरराव भोसीकर साहेब, उदघाटक डॉ. सुनिल कदम साहेब, नांदेड जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( श्री शरदचंद्र पवार ) गट, स्वागतध्यक्ष मा. सचिन कासलीवाल, संस्थापक अध्यक्ष किसानजन आंदोलन, विशेष अतिथी मा. सौ. संगीताताई डक, मा. बालकल्याण सभापती मनापा नांदेड, प्रमुख अतिथी मा.सौ. वैशालीताई हिंगोले/ गुंजरगे, राज्य सचिव महिला आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), मा. गणेश तादलापुरकर,मा. श्रीधर नागापूरकर, कार्यक्रमाचे आयोजक श्री शंकरसिहं ठाकूर, मुख्य संपादक दैनिक वीर शिरोमणी नांदेड, मा. मारोती शिकारे, साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा, अध्यक्ष मायडी बहुउद्देशीय संस्था, विनीत मा.त्रिरत्न कुमार भवरे, मुख्य संपादक तथा पत्रकार नांदेड, मा. रमेश सिंह ठाकुर दैनिक वीर शिरोमणी, मा. सोपान जाधव, साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले. प्रथम थोर पुरुष, महात्मे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. मारोती शिकारे, साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा, अध्यक्ष मायडी बहुउद्देशीय संस्था यांनी केले व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आदर्श व्यक्तीला विविध पुरस्काराने, विविध व्यक्तींना राज्यस्तरीय हा पुरस्कार दिला जातो. यामध्ये राज्यस्तरीय पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, संघटन, आरोग्य, कृषी, वन विभाग आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात येते. उल्लेखनीय व प्रशसनीय कार्य व्यक्तींची माहिती दिली निवड प्रक्रिया बद्दल व राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणाऱ्या मान्यवरांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर गौतम पवार यांनी केले.

आरोग्य क्षेत्रात मागील पंचवीस वर्षापासून आरोग्य सेवेमध्ये कार्य करणारे व आरोग्य विषयक चालू घडामोडी, विविध आजारांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचविणारे तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणारे व जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत ग्रामीण रुग्णालय भोकर येथे आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत असलेले सत्यजीत टिप्रेसवार यांना आरोग्य सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल ” मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा ” या अंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार -2024 ” देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी राजेंद्र चिंतलवार, सौ अनुजा चिंतलवार, सौ रंजना, महेश, चैतन्य टिप्रेसवार, सौ नंदिनी आनलदास, गजानन नंदलवार, चंद्रप्रकाश चन्ना, उमाकांत वाखरडकर, रघुनाथ हुंबे, कैलास कल्याणकर, साहेबराव कदम, मनोज तेलंग, रमेश वाघमारे, देविदास पेंढारकर, आत्माराम जाधव आदी उपस्थित होते.

नांदेड येथे दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला आहे. सत्यजीत टिप्रेसवार यांना हा ” मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा ” हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल वरिष्ठ अधिकारी, सहकारी कर्मचारी,पत्रकार बांधव, नातेवाईक,मित्र परिवार व सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!