अनोळखी मयताची ओळख पटविण्यासाठी पोलीसांना जनतेचे आवाहन
नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.29 सप्टेंबर रोजी दुपारी डंकीन परिसरातील लिंगायत स्मशानभुमीमध्ये 31 ते 32 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला. पोलीसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. तपासीक अंमलदार पोलीस उपनिरिक्षक बालाजी किरवले यांनी या माणसाची ओळख कोणाला असेल तर त्यांनी वजिराबाद पोलीसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
दि.29 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास लिंगायत स्मशान भुमीमध्ये 31 ते 32 वर्षीय व्यक्तीचे प्रेत सापडले.त्याचा चेहरा पुर्णपणे छिन्न-विछीन्न करण्यात आलेला आहे. या व्यक्तीची उंची अंदाजे 168 सेंटी मिटर आहे. त्याने फुल भायाचा काळा शर्ट आणि काळी जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. मरणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा बांधा मजबुत आहे. मरणाऱ्याच्या उजव्या हाताच्या पोटरीवर इंग्रजीमध्ये दीप असे लिहिलेले आहे. त्यापुऐ सुध्दा काही तरी अक्षर आहे पण तो ओळखू येत नाही. हे प्रेत बऱ्याच दिवसापासून तेथे असेल कारण ते पुर्णपणे डी कंपोझ झाले होते. सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक साहेबराव आलूसिंग आडे यांच्या तक्रारीवरुन या अनोळखी व्यक्तीला दगड किंवा कोणत्या तरी कठीण वस्तुने डोक्यात मारुन त्या चा खून करण्यात आला आहे. वजिराबाद पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 480/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बालाजी किरवले हे करीत आहेत.
बालाजी किरवले यांनी जनतेला आवाहन केले आहे की, मरणाऱ्या व्यक्तीची ओळख पटणे तपासासाठी अत्यंत आवश्यक असते. तेंव्हा या अनोळखी व्यक्तीच्या वर्णनासारखा कोणी व्यक्ती आपल्या ओळखीचा असेल आणि तो गायब असेल, त्याचा पत्ता मिळत नसेल तर जनतेने याबद्दलची माहिती वजिराबाद पोलीसांना द्यावी.जेणे करून या अनोळखी मयताची ओळख पटविता येईल.