बालाजी कल्याणकरांसह पाच जणांविरुध्द ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-एका भुखंडावर बळजबरी ताबा करण्याच्या प्रयत्नात एका पोलीस पुत्राला धमकावणे तसेच त्यांच्या आईच्या गळ्यातील 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसुत्र काढून घेतल्याप्रकरणी बालाजी कल्याणकरसह प ाच जणांविरुध्द ऍट्रॉसिटी कायद्याचा गुन्हा विमानतळ पोलीसांनी दाखल केला आहे.
राजरत्न दत्तात्रय शेळके (24) हे पोलीस कॉलनी स्नेहनगर येथे राहतात याचा अर्थ ते पोलीस पूत्रच असतील. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 13 जून 2023 रोजी सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान तरोडा(बु) येथील त्यांचा गट क्रमांक 182 या भुखंडावर त्यांची 0.5 आर जमीन आहे. त्या भुखंडावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतांना बालाजी गोविंदराव देशमुख (कल्याणकर), सौ.वर्षा बालाजीराव देशमुख(कल्याणकर), एक 25 वर्षाचा, एक 70 वर्षाचा असे दोन अनोळखी व्यक्ती आणि 50 वर्षाची एक अनोळखी महिला ज्यांची नावे मला माहित नाहीत अशा लोकांनी राजरत्न शेळकेच्या आईसोबत दुरव्यवहार केला आणि त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र तोडून नेले. राजरत्न शेळकेला तलवारीने जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि जातीवाचक शिवीगाळ केली. राजरत्न शेळकेच्या भुखंडावरील 8 सिमेंटचे खांब नाव लिहिलेले फलक बैलगाडीत घेवून गेले.
विमानतळ पोलीसांनी ही घटना भारतीय दंड संहितेच्या कलम 395, 307, 354, 323, 504, 427, 294 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 मधील कलम 3(1)(जी), (2), व्ही. ए. 3(1)(डब्ल्यू)(1) (2), 3(1) (आर) (एस) प्रमाणे गुन्हा क्रमांक 401/2024 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास शहर पोलीस उपविभागाच्या सहाय्यक पोलीस अधिक्षक कृतिका यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!