नांदेड(प्रतिनिधी)- तोतय्या पोलीसाने तिसरा प्रकार घडवत 26 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास एका 65 वर्षीय व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करून 50 हजार रुपये किंमतीची त्यांच्याकडील सोन्याची अंगठी लंपास केली आहे.
सुभाषराव भागोजी वाहुळे हे 65 वर्षीय व्यक्ती ई-स्केवरच्या बाजूने जात असतांना 26 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास रंगाने गोरा असलेला एक अनोळखी व्यक्ती ज्याने पोलीस गणवेश परिधान केेलेला होता तसेच एक अनोळखी व्यक्ती असे दोन जण त्यांच्याकडे आले आणि आम्ही पोलीस असल्याची बतावणी करून सुभाषराव वाहुळे यांच्याकडील 50 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी लंपास करून गेले. भाग्यनगर पोलीसांनी तोतय्या पोलीसांनी केलेली ही घटना गुन्हा क्रमांक 479/2024 प्रमाणे दाखल केली असून या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक शिरसाठ यांच्याकडे देण्यात आला आहे.