जमीन नावावर न करून देता 25 लाखांची फसवणूक

नांदेड(प्रतिनिधी)-सन 2012 मध्ये जमीनीची सौदाचिठ्ठी करून 25 लाख रुपये घेतले पण जमीन नावावर न करून देता खोटे बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या दोन जणांविरुध्द 25 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी लोहा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गंगाधर अनंतराव पवार रा.पवार गल्ली लोहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मौजे पार्डी ता.लोहा येथील संभाजी दशरथ कदम आणि दशरथ जळबा कदम यांना त्यांनी 2012 मध्ये 25 लाख रुपये आणि जमीनीची सौदाचिठ्ठी करून घेतली. सन 2023 पर्यंत जमीन नावार करून देतो म्हणून चालढकल केली. नोव्हेंबर 2023 मध्ये जुन्या तारखेचा सन 2012 चा बॉन्ड प्राप्त करून त्यावर गंगाधर अनंतराव पवार यांची व साक्षीदारांची खोटी स्वाक्षरी करून त्या नावांमध्ये काहींच्या स्वाक्षऱ्या नसतांना बनावट बॉन्ड तयार केला आणि 25 लाखांची फसवणूक केली.
लोहा पोलीसांनी ही घटना भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 465, 467, 468, 34 प्रमाणे गुन्हा क्रमांक 335/2024 प्रमाणे नोंदवली आहे. लोहाचे पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक आर.पी.पाटील अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!