बदलापूर येथील आरोपी अक्षय शिंदेचे एन्काऊंटर वादाच्या भोवऱ्यात ; उच्च न्यायालयाने विचारले दहा प्रश्न

नांदेड(प्रतिनिधी)-बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे एंन्काऊंटर खरे की, खोटे यावर चर्चा सुरू झाली आहे. उच्च न्यायालयाने पोलीसांना दहा प्रश्न विचारले आहेत. सध्या काही दिवसांत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर लाडकी बहिण ही योजना मध्य प्रदेशकडून घेतली तर एंन्काऊंटर उत्तर प्रदेशकडून घेतले अशी चर्चा आता सुरू झाली आहे. काही दिवसात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंदुक घेतलेले पोस्टर झळकतील आणि त्यांचा वापर निवडणुकीत होईल अशीही चर्चा सुरू झाली आहे. सोबतच एंन्काऊंटर करणारा अधिकारी आणि त्यांचा ईतिहास हा सुध्दा खुप वादग्रस्त आहे.
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे वडील यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून आपल्या मुलाचा एंन्काऊंटर खोटा आहे असा आरोप केला आहे. या रिट याचिकेच्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने पोलीसांना दहा प्रश्न विचारले आहेत. त्यात अक्षयने पोलीसांकडून खेचलेले ते पिस्तुल होते की, रिव्हॉल्वर होते?, पिस्तुलचे लॉक उघडून ते लोड करून अक्षने फायर केले काय?, पोलीसांची पिस्तुल अनलॉक का होती?, ज्या अधिकाऱ्याने एन्काऊंटर केला तो कोणत्या बॅचचा अधिकारी होता?, गोळी कुठून चालविण्यात आली?, किती लांबून गोळी झाडली गेली?, डोक्यातून आरपार झाल्यावर गोळी कुठे गेली? ती नेमकी कुठे लागली?, अक्षय शिंदेच्या डोक्यातच गोळी का मारली?, पोलीस डोक्यात गोळी मारतात की, पायावर गोळी मारतात?, पोलीसांनी तीन गोळ्या झाडल्या, एक लागली मग इतर दोन गोळ्या कोठे आहेत?, चार पोलीस एका आरोपीवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत काय? आदींचा समावेश आहे.
अक्षय शिंदेला तुरूंगातून न्यायालयात तारखेसाठी नेण्याची पहिली वेळ नाही. या अगोदर सुध्दा अक्षयला न्यायालयात नेण्यात आले. त्यावेळी त्याच्या डोक्यावर काळा कपडा लावलेला होता असे व्हिडीओ सुध्दा पुर्वी व्हायरल झालेले आहेत. या एन्काऊंटर विषयावर युटूयूबवर अनेक पत्रकारांनी विश्लेषण केलेले आहे. त्यामध्ये त्यांनी सुध्दा हे एन्काऊंटर खोटे असल्याचे मत व्यक्त केलेले आहे. ज्येष्ठ पत्रकार निखील वाघळे यांनी या एन्काऊंटरविषयी बोलतांना सन 2019 मध्ये तेलंगणा राज्यातील हैद्राबाद शहरात एका डॉक्टर युवतीवर बलात्कार करणाऱ्या चार जणांच्या एन्काऊंटरचा उल्लेख करत त्याहीवेळी आनंद व्यक्त करण्यात आला होता. पोलीसांवर फुले उधळण्यात आली होती. बदलापुर प्रकरणात सुध्दा असेच घडले आहे. वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने असे मांडणे आहे की, अक्षयच्या मृत्यूबदल वास्तव न्युज लाईव्हला दु:ख नाही पण पोलीसांना आरोपी मारून टाकण्याचा अधिकार आहे काय? हा प्रश्न नक्कीच आहे. तेलंगणा राज्यातील पोलीसावर नंतर खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याची आजची काय परिस्थिती आहे त्याबद्दल काही माहिती झाले नाही.
अक्षय शिंदेचे एन्काऊंटर झाल्यानंतर एका बहाद्दर पत्रकाराने त्याच्यावर गोळी झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा ईतिहास आपल्या बातमीमध्ये लिहिला आहे. तो पोलीस अधिकारी सुध्दा मोठा वादग्रस्त आहे. डिसेंबर महिन्यात साजऱ्या होणाऱ्या गटारी कार्यक्रमात या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या सोबतच्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी मारली होती आणि स्वत:लाही एक गोळी मारुन घेतली होती. अक्षय शिंदेच्या प्रकरणात गोळी लागलेला अधिकारी दुसरा आहे.एकूणच आता अक्षय शिंदेचे एन्काऊंटर उच्च न्यायालयाच्या समोर प्रलंबित आहे. न्यायालय योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा करू या.
एन्काऊंटर करून त्याचा उपयोग येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये घेण्याचा विचार सुध्दा समोर येत आहे. सोबतच त्या शाळेतील आणखी एक बालिका सध्या गायब असल्याचे बोलल्या जाते. लहान मुलांचे आक्षेपार्ह व्हिडीओ या बाबत सुध्दा चर्चा सुरू झाली आहे. संस्था चालकाला वाचविण्यासाठी एन्काऊंटर करण्यात आले असेही सुरु आहे. या सर्व प्रकरणांमध्ये या एन्काऊंटरचा उपयोग राजकीय फायदा घेण्यासाठी केला जाणार असल्याचे विश्लेषण अनेक पत्रकारांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!