नवीन नांदेड :- हडको येथील श्रीबालाजी मंदिर देवस्थान आनंद सागर हौसिंग सोसायटी हडको नवीन नांदेडच्या २२व्या दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य दि. ३ ते १२ ऑक्टोंबर २४ दरम्यान सकाळी व सायंकाळी दैनंदिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, ब्रम्होत्त्सव निमित्ताने रंगरंगोटी व रोषणाई मंदिर परिसरात करण्यात येत आहे.
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, ब्रह्मोत्सवा निमित्य आचार्य पंडिताचा मार्गदर्शना खाली करण्यात येत असून दि.३ ते १२ऑक्टोंबर दरम्यान सकाळी ४ वाजता सुप्रभात,५ ते७ बालभोग आरती,८ ते १०ध्वजारोहण, देवता स्थापना,कलश स्थापना,अंकुर रोपण, व होम हवन ने सुरुवात होईल व दुपारी २ ते ४ विष्णुसहस्त्र नाम सायंकाळी ४ते ६ होमहवन होणार तर ब्रम्होत्सव दरम्यान सकाळी दैनंदिन व सायंकाळी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे, बालाजी लक्ष्मी पद्मावती कल्याण उत्सव १०रोजी श्री बालाजी लक्ष्मी पदमवाती कल्याण उत्सव,११ रोजी विष्णुसहस्त्र नाम व होमहवन ६ ते ८ मिरवणूक, १२ रोजी ऑक्टोंबर रोजी दसरा निमित्ताने सकाळी होम हवन,दैवता विसर्जन,पुर्णाहुती, बली प्रदान व प्रसाद वाटप आयोजित करण्यात आला आहे.
होम हवन व कल्याण उत्सव पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान यांच्या उपस्थितीत होणार असून आजीवन प्रसाद बालभोग यजमान नोंदणी शुल्क १५००/ , व दहा वर्षीय अभिषेक सेवा नोंदणी चालू असून अभिषेक नोंदणी म्हणून शुल्क म्हणून ३१०० रुपये चालु असुन ब्रम्होत्सव मध्ये भाविक भक्तांनी सहभागी होण्याचे व दसरा ब्रह्मोत्सवा निमित्य आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अरुण दमकोडंवार ,उपाध्यक्ष गोवर्धन बियाणी,सचिव बाळासाहेब मोरे ,कोषाध्यक्ष चंद्रशेखर चोहाण, सहसचिव बालकृष्ण येरगेवार,संस्थापक माणिकराव देशमुख,करण सिंग ठाकूर,संतोष वर्मा,संजिवन राजे, अजय भंडारी,विवेकानंद देशमुख, प्रकाशसिंग परदेशी,सचिन नपाते,सुभाष कारंजकर ,किशोर देशमुख, यांनी केले आहे