नांदेड(प्रतिनिधी)-परतीचा पाऊस जातांना झोडपत आहे. नांदेड जिल्ह्यापेक्षा वरच्या ठिकाणी असलेले जायकवाडी धरण पुर्णपणे भरलेले आहे. त्यामुळे गोदावरी नदीतील पुराचा धोका अद्याप संपलेला नाही. आज दुपारी 2 वाजता डॉ.शंकरराव चव्हाण विष्णुपूरी धरणातील एक दरवाजा उघडण्यात आला आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीच्या काळात पावसाने दडी मारली होती. परंतू नंतर मात्र जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेच. काही अंशी सोयाबीनचे पिक आले होते. पण ते आता काढणीसाठी आले असतांना पुन्हा परतीच्या पावसाने झोडपणे सुरू केले आहे. गोदावरी नदीवरील पैठण येथे असलेले जायकवाडी धरण 100 टक्के भरलेले आहे आणि अजूनही त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आज दुपारी 2 वाजता नांदेड येथील विष्णुपूरी प्रकल्पातील एक दरवाजा उघडून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाऊस आता लवकरच थांबला नाही तर सोयाबीन काढणीला आले आहे. त्याचे नुकसानपण होईल. सोबतच जायकवाडीमधून पाण्याचा विसर्ग बाहेर पडत आहे. म्हणून विष्णुपूरी प्रकल्पावर त्याचा दबाव वाढेल. त्यासाठी विष्णुपूरीची दारे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू होईल आज सध्या एकच दरवाजा सुरू आहे. त्यातून 10 हजार क्युमेक्सपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण जायकवाडीतून जेवढ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होईल म्हणजे ते पाणी पुन्हा विष्णुपूरीकडे येईल म्हणून विष्णुपूरीचे दरवाजे जास्त संख्येत सुध्दा उघडले जाऊ शकतात. म्हणजे आजही पुराचा धोका पुर्णपणे समाप्त झालेला नाही.