मोटार विभाग कर्मचारी संघटना यांच्या वतीने विविध मागण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कर्मचारी यांच्या बेमुदत संप

नवीन नांदेड:- प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटना सल्गंन्न मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना नांदेड यांच्या वतीने राज्यात पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात सहभागी होऊन कर्मचारी यांनी २४ सप्टेंबर पासून रास्त व न्यायिक मागण्यासाठी आकृती बंधाची अमंल बजावणी करावी यासह विविध मागण्या साठी कर्मचारी संघटना पदाधिकारी यांनी प्रवेशद्वार येथे बेमुदत संप पुकारला आहे, यावेळी संबंधित कर्मचारी यांनी प्रचंड घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

राज्यभर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मोटार वाहन कर्मचारी संघटना यांच्या वतीने २४ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारला असून नांदेड येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय येथेही संघटनेच्या वतीने सेवा प्रवेशाची तात्काळ अमंल बजावणी करावी, समायोजन रध्द करावे, महसुली बदल्या रध्द करा, कळसकर समितीची सुधारित अमंलबजावणी करा व सेवा प्रवेशातील जाचक अटी रध्द करा यासह विविध मागण्या संदर्भात बेमुदत संप पुकारला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटना नांदेड सल्लंन्न मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई अध्यक्ष रोहीत कंधारकर,राजेश गाजुलवाड, उपाध्यक्ष श्रीमती जे.आर.वाघमारे,सचिव जि.के. पवळे, सहसचीव श्रीमती आर.जी.जेलेवाड, कोषाध्यक्ष पि.जी.मरवाळे,सह कोषाध्यक्ष श्रीमती एस.एस.जोशी, संघटक जि.एम.शिंदे,सह संघटक जि. डी. टाक,श्रीमती एस.आर.चव्हाण,यांच्या सह सल्लागार आर.डी.पवळे,यांच्या सह गजानन पवळे,प्रभाकर मरवाळे,जयश्री डोंगरे श्रीमती राजेश्रीमंत चौधरी,श्रीमंती शुभांगी जोशी,अंबादास राऊत,ठाकरे, रंगनाथ गोरे, गजानन शिंदे, दिपक कोमलवार,आदिनाथ केंद्रे,बालाजी मोरे, महानंदा बोदमवाड,

यांच्या सर्व विभागातील कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला,यावेळी सिमा नाका भागातील देगलूर, बिलोली, भोकर, या तिन्ही नाक्यावरील नांदेड हिंगोली, परभणी येथील कर्मचारी यांनी ही सहभाग नोंदविला.

बेमुदत संपामुळे कार्यालयातील विविध विभागात कर्मचारी अभावी शुकशुकाट दिसून आला.  संपाचा पाश्वर्वभुमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड व सिमानाका भागातील चेक पोस्टवर उपनिरीक्षक यांच्या नियुक्ती करण्यात आली असून कार्यालयीन कामकाज सुरळीत असल्याचे प्रादेशिक परिवहन ऊप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!